Download App

आठवलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण खासदार, आमदार यांच्या आरक्षणाला विरोध

Ramdas Athawale On Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळे जमीनदार, उद्योगपती, मंत्री, खासदार, आमदार यांना आरक्षण द्या असे नाही. मराठा समाजात ज्याचे उत्पादन आठ लाखांपेक्षा कमी आहे. त्या कुटुंबाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. ओबीसी सजामात देखील आठ लाखांपेक्षा कमी ज्याचे उत्पादन आहे त्यांनाच आरक्षण मिळत आहे. त्यामुळे यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आमच्या पक्षाचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर रिपाई स्थान मिळणार आहे का? यावर रामदास आठवले म्हणाले की ते जरी करत असले कितीही दावे पण आरपीआयला एक तरी मंत्रिपद द्यावे. आरपीआयला मंत्रिपद हवे आहे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

ते पुढं म्हणाले की आमचा विस्तार होणार होता पण त्याआधी अजित पवार यांचा झाला. त्यामुळे विस्तार थांबलेला आहे. जेवढे 42-43 मंत्री भरायचे आहेत ते भरले पाहिजेत. त्यामध्ये आरपीआयला एक मंत्रिपद मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगितले जात आहे की विस्तार होणार आहे पण अजून झाला नाही.

अजित पवार यांच्यामुळे विस्ताराला ब्रेक लागला आहे का? यावर रामदास आठवले म्हणाले की त्यांच्यामुळे ब्रेक लागला नाही. अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. आमची 167 आमदारांपर्यंत होती. आम्हाला अजित पवार यांची गरज देखील नव्हती. अजित पवार 2019 ला शपथ घेण्यासाठी आले होते. तेव्हापासून त्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती. तेव्हा निर्णय झाला नाही. पण जेव्हा उद्धव ठाकरे सरकार गेले. आणि महायुतीचे सरकार बनलं. मग अजित पवार स्वतःहून आले त्यांना आम्ही फोडले हा आरोप चुकीचा आहे. मंत्रीमंडळ विस्तार, महामंडळ हे सर्व बाकी आहे ते लवकर करावे, अशी आरपीआयची मागणी आहे.

Tags

follow us