Download App

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अनेक सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया

बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सर्वच स्तरातून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे.

Celebrities On Badlapur Sexual Assault: गेल्या काही दिवसांत देशामध्ये महिलावर लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Badlapur Sexual Assault) कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर (Kolkata Sexual Assault) आता बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सर्वच स्तरातून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी या घटनेविषयी सोशल मीडियावरुन त्यांचं मत मांडताना दिसत पाहायला मिळत आहेत.

 

रितेश देशमुखची पोस्ट

रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) बदलापूरमधील घटनेचा निषेध नोंदवत शिवरायांनी दिलेल्या शिक्षेचा दाखला दिला. रितेशने लिहले आहे की, ‘एक पालक म्हणून मी पूर्णपणे वैतागलोय, दुखावलोय आणि प्रचंड चिडलोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी.या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात दोषींना ‘चौरंग’ शिक्षा द्यायचे. हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे.’


उत्कर्षची संतप्त पोस्ट

उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) दोन हातात बेड्या अडकवलेला माणूस दाखवला आहे. बदलापूर रेप आणि POSCO ACT चा उल्लेख करुन उत्कर्ष लिहिले आहे की, “षंढासारखं वागायचं, मेंढरासारखं जगायचं आपल्या घरात थोडीच झालाय रेप कुणाचा म्हणत आपण फक्त बघ्या सारखं बसायचं.” पुढे उत्कर्षने आणखी एक फोटो पोस्ट केलाय. यात ज्वाळा दिसत असून पाठमोरी छोटी मुलगी दिसत आहे. तिच्यावर Am I Next? असं लिहिण्यात आलंय. या फोटोवर उत्कर्ष लिहितो, “बाळ झोपलंय आवाज करु नका दचकेल म्हणणारे आपण आज तेच बाळ भीतीने मरायची वेळ आली तरीही शांतच का? समाजात बदल घडवायचा की नाही?, अशी पोस्ट त्याने यावेळी केली.

Badlapur Sexual Assault (1)

प्रसाद खांडेकरची पोस्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम (Prasad Khandekar) अभिनेता प्रसाद खांडेकरने महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ‘रक्षाबंधन आणि भाऊबीज ह्यांसारखे सण त्यांच्यासाठी नसतीलच …त्यांच्या स्वतःच्या आया बहिणी तरी कश्या जातील त्यांच्या जवळ…’, असं प्रसादने पोस्टमध्ये सांगितले.


मृण्मयी देशपांडेची पोस्ट

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने (Mrunmayee Deshpande) स्वत: च्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तिने प्रशासनाला सवाल केला आहे. माणूस म्हणून नक्की कुठे जातो आहोत आपण ?असं लिहित तिने प्रश्न उपस्थित केला आहे. # बदलापूर असा टॅग देत मृण्मयीने ही स्टोरी पोस्ट केली आहे.

Riteish Deshmukh: ‘त्या राक्षसाला शिवकाळातील चौरंग शिक्षा’, बदलापूरमधील घटनेवर अभिनेत्याची संतप्त पोस्ट

‘किरण मानेची पोस्ट (Kiran Mane)

अभिनेता किरण मानेने बदलापूरमधल्या नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार होतो. पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलेल्या पालकांना एक नाही दोन नाही तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात येतं… बारा तास !आपल्या महाराष्ट्रात बलात्कारीत चिमुरड्या मुलींचे हताश आईबाप पोलीस स्टेशनमध्ये बारा तास ताटकळत बसतात !!!


…मिडीयाला हाताशी धरून ही घटना दाबून ठेवली जाते… कशासाठी??? तर या नराधम सत्ताधार्‍यांना निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ‘लाडकी बहिण’ योजनेचा ‘पेड इव्हेन्ट’ करत महाराष्ट्रभर मिरवत फिरायचंय… त्याचा गवगवा करायचाय… दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा गळा घोटुन करोडो रूपयांची माती करत केलेल्या या ‘सेलीब्रेशन’ची किंमत या क्रूरकर्म्यांना चुकवावी लागणार आहे. एका बाजूला वेदनेनं तडफडणारी लेकरं, आईबाप आणि दुसर्‍या बाजूला त्या घटनेकडं कानाडोळा करून ‘मतांसाठी’ बहिणींना भिक दिल्याचा साजरा झालेला उत्सव ही महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात घृणास्पद, लाजीरवाणी आणि संतापजनक घटना म्हणून नोंद होईल.

…खरंतर घटनेचं गांभीर्य एवढं आहे की घटना घडलेल्या दिवसापासून एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि प्रशासन बदलापूरमध्ये तळ ठोकून बसायला हवं होतं. पण… इव्हेन्ट महत्त्वाचा होता ! कुणीही फिरकलं नाही. तब्बल चार दिवसांनी फाॅरमॅलिटी म्हणून मुख्याध्यापिकेला निलंबीत केलं, वर्गशिक्षीकेला नोकरीवरून काढलं आणि बलात्कार्‍याचे शाळेबरोबर असलेले काॅन्ट्रॅक्ट रद्द केलं… व्वा !

मुलींना न्याय मिळावा म्हणून आज रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करणार्‍या भावांवर, माताभगिनींवर अमानुष लाठीचार्ज केला गेला…नोट माय वर्डस्…या कोडग्या आणि नालायक राज्यकर्त्यांना तमाम महाराष्ट्रातल्या लहान लेकीबाळींचा तळतळाट लागणार आहे !

follow us