Download App

सैफ अली खान हल्ला प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Saif Ali khan Stabing Case : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला (Saif Ali Khan) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचं थेट बांग्लादेश कनेक्शन समोर येत आहे. नाव बदलून तो येथे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (वय 30) असे त्याचे नाव आहे.

अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीला वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोठी बातमी! सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; ठाण्यातून उचलले

आरोपीला ठाण्यातून उचललं

पोलिसांनी दिलेल्या (Mumbai Police) माहितीनुसार, याआधी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी हा आरोपी वेष बदलून ठाण्यातील कामगार वसाहतीत लपला आहे. पोलिसांनी या वसाहतीला घेराव घालून मोठ्या शिताफीनं या हल्लेखोराला ताब्यात घेतलं. आता या हल्लेखोराची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. यातून सैफवर हल्ला करण्याचा त्याचा उद्देश नेमका काय होता हे समोर येईल.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर हा बांग्लादेशी घुसखोर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानेत सैफवर चाकू हल्ला केला असावा असा संशय पोलिसांना आहे. ठाण्यातील कामगार वसाहतीत तो वेष लपवून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या परिसराची नाकाबंदी केली. घेराव घातला. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीशी या व्यक्तीचा चेहरा मिळताजुळता दिसत आहे. पोलिसांना त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी काल मध्य प्रदेशातून एका संशयिताला अटक केली. त्याची चौकशी सुरू केली होती. परंतु, पोलिसांनी या संशयितासह आणखी ज्यांना कुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यांचा बहुतेक या प्रकरणाशी काही संबंध नसावा असे वरकरणी दिसत आहे. पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच या शक्यतेवर शिक्कामोर्तब होईल.

सैफवर हल्ला करणारा बांग्लादेशी? घरात कसा घुसला? कुणी मदत केली; पोलिसांनी सगळचं सांगितलं..

करिनाने पोलिसांना काय सांगितलं?

हल्लेखोर घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता. खान कुटुंबीय कसेबसे बाराव्या मजल्यावर गेले. समोरच दागिने पडले होते पण हल्लेखोर तिथे पोहोचू शकला नाही. त्याने कोणत्याही वस्तुंची चोरी केली नाही. ज्यावेळी सैफ आणि त्याच्यात झटापट सुरू होती त्यावेळी तो आरोपी खूप आक्रमक झाला होता, अशी माहिती अभिनेत्री करिना कपूर खान हीने पोलिसांना दिली होती.

follow us