Sanjay Raut : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात राज्यातील (Lalit Patil Drugs Case) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. ससून रुग्णालायातून पसार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. त्याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या गिरणा नदीपात्रात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. या घटनेचे जोरदार पडसाद उमटत आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात गाजत असलेलं ड्रग्ज प्रकरण आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीका केली.
Uddhav Thackeray : ‘शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या’.. ठाकरे गटाचा घणाघात
ड्रग्जचा रावण संपवायलाच हवा
राऊत म्हणाले, हजारो कोटींचं ड्रग्ज महाराष्ट्रात कसं येतं? त्यांना कुणाचं संरक्षण आहे? अर्ध ग्रॅम ड्रग्ज सापडल्यावर हे आकांडतांडव करतात. पण, देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही असून येथे 500 कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. जे यातून सुटलं ते मुलांकडे कॉलेजमध्ये, महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. उडता पंजाब, उडता गुजरात झाल्यानंतर आता महाराष्ट्राला केनिया, नायजेरियाच्या दिशेने घेऊन जात आहात का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातून मोठे उद्योगधंदे गुजरातला गेले. तिथून इकडं काय येतंय तर ड्रग्ज. या ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायलाच हवा. आम्ही ते करू. जे होईल ते पाहू, असा इशारा राऊत यांनी दिला.
पंचवटीत ड्रग्जचा व्यापार, फडणवीसांना माहिती नाही का?
देवेंद्र फडणवीस यांना सध्या फार कंठ फुटला आहे. ते एका गरब्यात गेले आणि त्यांनी गर्जना केली की देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा. मग कधी बोलत नव्हता का? त्या बच्चापर्यंत ड्रग्स पोहचल जात आहे. आधी त्यांचा बंदोबस्त करा. पंचवटी रामाचंच ना? पण, आज त्याच पंचवटीमध्ये सर्वात जास्त ड्रग्जचा व्यापार सुरू आहे. हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नाही का? असा सवाल राऊत यांनी केला. पैठण, नागपूर, नाशिक, विदर्भ अशा ठिकाणी ड्रग्ज मिळते. मुंबई पुण्यामध्ये व्यापार सुरू आहे. ड्रग्जचा रावण आजूबाजूला फिरत आहे त्या रावणाला संपवा आणि नंतर श्रीरामाचे नाव घ्या, असेही राऊत म्हणाले.
ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार