Sanjay Raut On Amit Shah : शिवतिर्थावरील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार समाचार घेतला आहे. गृहमंत्री अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई आहे. तो गुंड आणि माफियाची टोळी चालवतोय, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.
खासदार संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 60 वर्षे पूर्ण झाले आहेत. जे 60 वर्षे या अग्नीबरोबर जगले असतील, ते धन्य झाले असतील. आज दोन शिवसेनेची मेळावे होत आहेत. पण शिवसेना एकच, बाळासाहेब ठाकरेंची आहे. हा समोर दिसतोय हा टिकाऊ माल आहे. नेस्को सेंटरवर विकाऊ माल आहे. तिकडे अमित शाहांचा दांडिया आहे. ते दांडिया खेळत बसले असतील विचार नाही. संघर्ष नाही. महाराष्ट्र असले, देश असेल, स्वाभिमान असेल, कोणती भूमिका नाही. विचार इकडे आहे. महाराष्ट्र धर्म इकडे आहे. इथे प्रत्येकाचा हातात गद्दारांसाठी बांबू आहे.
मुंबईतील अंडरवर्ल्डबरोबर आम्ही वाढलेले आहोत. कोण कुठे हत्यार काढेल आहे आणि चालविले हे आम्हाला माहिती असते. लॉरेन्स बिष्णोई अस्तित्वात नाहीत. अमित शाह हाच लॉरेन्स बिष्णोई आहे. या देशाचा गृहमंत्री ज्याच्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. तो एक माफिया आहे. लॉरेन्स बिष्णोई नाव आहे, गुंड व माफियाची टोळी अमित चालवत आहे. गुजरातचे अमित शाह लॉरेन्स बिष्णोई आहेत. त्यामुळे रेझिम चेंज करायचे आहे.
गुंडाचे सरदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस
शस्त्र देवांच्या हाती आहेत, पण मुंबईत ते गुंडाच्या हातात गेले आहेत. गुंडाचे सरदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहेत. कायदा व सुव्यवस्था मुडदा पडतोय. लोकांचा सुरक्षा हवे, असले तर शिवसेना शस्त्र आहे. जो शिवसेनेचे नाव घेईल, त्यांचे संरक्षण होईल. आज शस्त्रपूजा धनुष्यबाण नसेल, उद्याच्या दसराला येथे धनुष्यबाण असेल, भगवान श्रीरामने राजपाट सोडला, माता-पिता सोडली, अयोध्या सोडली पण शेवटपर्यंत धनुष्यबाण सोडला नाही, आम्ही धनुष्यबाण सोडणार नाही. न्यायालयात खटला आहे. पुढल्या दसऱ्याला धनुष्यबाण फक्त आपला असेल.
पुढच्या दसऱ्याला धनुष्यबाण आपलाच-संजय राऊत
हा देशाच्या तरुणांना मुर्ख बनविले आहे. ठार वेडे करून टाकले आहे. काही प्रश्न विचारले, तर जय श्रीराम बोला म्हणतात. दहा वर्षे जय श्रीराम बोलले आहे. तुम्ही हे राम बोला, तुमची जायची वेळ आली आहे. मला काही लोक विचारतात, हे सरकार कधी जाईल ? मी त्यांना सांगतो, नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठेसाठी अभिजित मुहूर्त काढला होता. द्रविड गुरुजी आहे. राम मंदिराची उभारणी झाली. मुहूर्त चुकला आहे. राम मंदिर ज्या पद्धतीने लुटले गेले. दानपेटीवर दरोडा टाकले आहे. राम, सितामाईची अलंकार लुटले गेले आहे. ज्या अयोध्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली रक्त सोडले आहे. भाजपच्या डाकूंनी 1400 कोटींची लूट केलीय. दानपेटी चोरले आहे. अलंकार चोरले, पादूका चोरल्या आहेत. सितामाईची कर्णफुले चोरली आहे. मंगळसूत्र चोरीला गेली आहे. कोणत्या मुहूर्त राममंदिराची चोरी मोदी जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाणार आहे. आता मोदी आणि अमित शाह राहणार आहे. मला स्वप्न ज्ञानेश कुमार जाणार आहे. ग्यानाला वाचविण्यासाठी आहे. अमित शाह राहतात, चार किलोमीटर परिसर आहे. दोन लाख शस्त्र सैनांनी एका माणसाच्या सुरक्षेसाठी आहे.
