Saraswati Vaidya Murder case :
मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी मनोज साने याने आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, आमच्यात कधीही शारिरिक संबंध आले नाहीत, सरस्वती माझ्या मुलीसारखी होती, तिला मी मारलं नसून तिने आत्महत्या केल्याचा दावा आरोपी मनोज सानेने केला आहे. (Saraswati Vaidya Murder case During the investigation police found victim and accused were married)
अशात आता पोलीस तपासात मनोज आणि सरस्वती यांनी लग्न केलं असल्याच समोर आलं आहे. पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी एका मंदिरात लग्न केले होते. दोघांमध्ये वयाचे अंतर होते. त्यामुळे अनाथ आश्रमात जाताना ती सर्वांना साने मामा असल्याचे सांगत होती. सानेसोबत लग्न केल्याचे तिने बहिणींना सांगितले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
32-year-old woman, Saraswati Vaidya killed by 56-year-old live-in partner Manoj Sane | Statement of victim's three sisters being recorded, DNA test will be done. Sisters were in constant touch with Saraswati, therefore their statements are very important. After forensic…
— ANI (@ANI) June 9, 2023
सरस्वती वैद्यला एकूण 3 बहिणी आहेत. सर्व बहिणी अनाथ आश्रममध्ये राहात होत्या. चौघींमध्ये सरस्वती सर्वात लहान होती. या तिघीही सरस्वतीच्या नियमीतपणे संपर्कात होत्या. त्यामुळे त्यांचे जबाब महत्वाचे असणार आहे. दरम्यान, या तिघींचीही डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. तसंच सरस्वतीच्या शरीराच्या तुकड्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असून त्यानंतर उर्वरित मृतदेह बहिणीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
मनोज आणि सरस्वती यांच्यात 10 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मागील 3 वर्षांपासून ते मीरा रोड परिसरात एकत्र राहत होते. पण मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. यातूनच मनोजने सरस्वतीची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली. तिची हत्या करुन मृतहेदाचे तुकडे केले. ते मनोजने कुकरमध्ये शिजवले. एवढंच नाहीतर ते तुकडे मिक्सरमध्ये बारीक करुन कुत्र्याला खाऊ घातले. या क्रुर घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मनोज सानेला ताब्यात घेतलं आहे.
सरस्वतीच्या हत्येनंतर मनोजच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले मनोज पळून निघाला होता. त्याचवेळी त्याला लिफ्टचा दारातून अटक केली. त्याला घरात घेऊन गेल्यानंतर समोर दिसलेली परिस्थिती पाहुन पोलिसही हादरुन गेले होते. पोलिसांना घरात हॉलमध्ये झाड कापण्यासाठीचे कटर दिसून आले. तसंच बेडरुममध्ये जावून पाहिले असता बेडवर काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि रक्ताचे डाग दिसले.
अनाथ आश्रममध्ये राहणारी सरस्वती उदरहनिर्वाहासाठी मुंबईत आली. त्यावेळी ती आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. त्यानंतर जॉबच्या शोधत असताना तिची मनोज साने याच्याशी ओळख झाली. मनोज आणि सरस्वतीची एका रेशनच्या दुकानात भेट झाली होती. त्यानंतर सरस्वतीला आधार देण्याचे आश्वासन देऊन त्याने तिचा विश्वास संपादन केला. पुढे एकत्र रहायचे म्हणून दोघांनी मंदिरात लग्न केले. मात्र दोघांमध्ये वयाचे अंतर जास्त असल्याने त्यांनी हे लग्न जगापासून लपवून ठेवले होते, अशी माहिती आहे.