Download App

Satyjeet Tambe यांनी घेतली अनोखी शपथ; वडिलांचे कौतुक करणारे ट्वीट

  • Written By: Last Updated:

मुंबईः विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी घेतलेली शपथ मात्र अनोखी ठरली आहे.

इतर सदस्य आपले वरिष्ठ नेते आणि श्रेष्ठींची नावे घेत असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची नावे घेतली. तर आपले आजोबा, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून शपथ घेतली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांनी सहकारमहर्षी, स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याला वंदन करूनच अर्ज दाखल केला होता.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या प्रतिष्ठेच्या लढाईत भरघोस मतांनी निवडून आलेल्या तांबे यांनी आज अधिकृतरित्या विधिमंडळात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद सदस्य पदाचा अनुभव असलेले आमदार सत्यजीत तांबे हे पहिल्यांदाच विधान परिषदेवर निवडून आले आहेत.

Dr Pradnya Rajiv Satav : काँग्रेसच्या आमदारावर कळमनुरीत हल्ला!

आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर सत्यजीत तांबे हे लगेच कामाला लागले आहेत. शिक्षकांचे आंदोलन मुंबईत आझाद मैदानात सुरू आहे. त्या ठिकाणी जावून तांबे यांनी त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन तांबे यांनी दिले आहेत. याचबरोबर सत्यजीत तांबे आता मतदारसंघातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव व नगर जिल्ह्याचा दौैऱ्याचे नियोजन केले आहे. मतदारांचे ते आभार मानणार असून, त्याचबरोबर पदवीधर, शिक्षकांच्या अडीअडचणी ते जाणून घेणार आहेत.

या शपथविधीनंतर त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी त्यांचे कौतुक करणारे एक ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुधीर तांबे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून सत्यजीतने आज विधानपरिषद सदस्यपदाची शपथ घेतली. मला विश्वास आहे की, सत्यजीत या पदाला योग्य न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सत्यजीत, तुला पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!

Tags

follow us