BARC Scientist Suicide: चांद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश शास्त्रज्ञांचे कौतुक करत आहे. तर इकडे मुंबईत (Mumbai) एका शास्त्रज्ञाने टोकाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील अणुशक्ती नगर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) काम करणाऱ्या 50 वर्षीय शास्त्रज्ञाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police) ही माहिती दिली आहे. मनीष शर्मा असे मृत्यू झालेल्या शास्त्रज्ञाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
शर्मा यांनी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या साह्याने पंख्याला लटकून गळफास घेतला. त्यांच्या पत्नीने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने अॅम्बुलन्सने बीआरसी हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, वैज्ञानिक मनीष शर्मा यांच्या घरातून एक सुसाईड नोट मिळाली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी एडीआर नोंदवला आहे. शर्मा मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mumbai : पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मुलींनीच आईला दिला खांदा…
बीएआरसीच्या हेलियम प्लांटमध्ये केली होती आत्महत्या
सप्टेंबर 2021 मध्ये मुंबईतील मानखुर्द येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातील एका शास्त्रज्ञाने कॅम्पसमधील हेलियम प्लांटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तांत्रिक भौतिकशास्त्र विभागतील वैज्ञानिक अधिकारी चंपालाल प्रजापती (44) यांनी आत्महत्या केली होती, असे ट्रॉम्बे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना; रक्षाबंधनादिवशी दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
ते मूळचे सुजानगड, राजस्थानचे होते आणि सुपरकंडक्टरमध्ये पारंगत होता. घटनेच्या दिवशी वेळेत घरी न पोहोचलेल्या त्यांच्या पत्नीने सहकाऱ्यांना फोन केला असता त्यांना चंपालाल प्रजापती काही वेळाने लटकलेल्या अवस्थेत आढळले होते.