Download App

महाराष्ट्रातला माणूस भीक नाही तर…,शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला

पुणे : महाराष्ट्रातला माणूस भीक मागत नाहीतर मोठ्या हिमतीने, कष्टाने संकटांवर मात करत असल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी झाला. त्यावेळी पवार बोलत होते.

ते म्हणाले, सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसापुढे महागाईचे संकट उभे राहिले आहे. बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाही. या परिस्थितीत महापुरुषांनी भीक मागितली, असे विधान राज्यातील नेते करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

तसेच विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. यानिमित्ताने बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात जागर केला जाईल. कृषी खात्याचा मंत्री झाल्यावर या क्षेत्रात सगळ्यात चांगलं काम कोणी केले.

यासंदर्भात माहिती घेत असाताना महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कृषी क्षेत्रात चांगले काम असल्याचे दिसून आले. फुले यांनी आधुनिक विचाराची कास धरली. त्याकाळी नवा विचार हाती घेतला, असे पवार यांनी सांगताना सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

या देशात समाज परिवर्तन करण्याचे काम काळ अनुकूल नसताना ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी केलं
, महात्मा फुले हे आधुनिकता, विज्ञान या सगळ्यांचे पुरस्कर्ते होते. बेरोजगारीच संकट आहे, लोकांना काम करण्याची संधी दिली जात नाही.

राज्यातले उद्योग बाहेर जात आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत. नोकरी नाही म्हणून लग्नासाठी मुलांसाठी मुली मिळत नाहीत. बेरोजगारीचा परिमाण मुलांची लग्न थांबण्यावर झालाय. जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

दरम्यान, राज्यातील लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी वळवल जात असून कधी जातीचं नाव, कधी धर्माच्या नावाचा वापर करुन राजकारण केलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us