मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांचा एक व्हिडीओ मॉर्फ (video viral) करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणात शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा रॅलीतील व्हिडीओ असून फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजवरुन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही लोकांवार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस कार्यवाही करत आहेत.
तक्रार दाखल केल्यानंतर शीतल म्हात्रे म्हणाल्या की, मी देखील कोणाचीतरी आई, बहिण, मुलगी, सुन, बायको आहे. ज्यांनी केलं आहे त्यांच्याही घरी आई, बहिण, बायको असेल. एखाद्या महिलेच्या संदर्भात एवढ्या खालच्या पातळीवर लिहिणं, बोलणं, खोटे व्हिडीओ टाकणे अशाप्रकारे वागणं कोणालाही शोभणारे नाही. यांच्यावर कडक कारवाई होणारचं आहे. दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर देण्यासाठी कार्यकर्त्या महिला, शिवसेना पदाधिकारी आलो होतो. ज्यांनी हा प्रकार केला आहे ती युवासेनेची कार्यकर्ते आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन
दहिसरमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रॅलीसाठी आले होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करत या रॅलीत सहभागी झाले होते. मात्र, अज्ञात व्यक्तींनी रॅलीतील व्हिडीओ एडीट केला. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या या व्हिडीओमध्ये अश्लील मजकूर लिहून तो व्हायरल करण्यात आला होता. यानंतर शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तात्काळ तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.