‘शिंदे गुवाहाटीत नव्हे अयोध्येत करणार होते बंड’; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Maharashtra politics : शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. सुरतवरुन गुवाहाटी येथे गेले होते. आता ठाकरे गटाचे आमदार नितीन […]

UPSC Exam (17)

UPSC Exam (17)

Maharashtra politics : शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. सुरतवरुन गुवाहाटी येथे गेले होते. आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी ऐवजी अयोध्येत बंड करण्याचा निश्चय केला होता. पण ऐनवेळी हा प्लॅन थांबवण्यात आला, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या ठाकरे गटाने एक पॉडकास्ट (ShivSena Podcast) जारी केला आहे. त्यात देशमुखांनी वेगवेगळे खुलासे केलेत. नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील बंड फार पूर्वीच होणार होते. ते ही अयोध्येत. त्यांची सर्व तयारी झाली होती. माझे तिकीटही काढण्यात आले होते. पण ऐनवेळी सर्व रद्द झाले.

‘डॉक्टर एकनाथ शिंदेंमुळे गळ्यातला पट्टा गेला, चालायला लागले’

नितीन देशमुख यांनी सांगितले की आदित्य ठाकरे 15 जून 2022 रोजी अयोध्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा शिंदे व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना अयोध्येला बोलावून तिथेच रोखून धरण्याचा प्लॅन आखला होता. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार असल्यामुळे हे बंड तिथे यशस्वी होईल असा त्यांचा व्होरा होता. यासाठी एका आमदाराने माझे तिकीटही काढले. पण त्यानंतर दौरा रद्द झाल्याचा निरोप मिळाला, असे त्यांनी सांगितले.

20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांत सत्ता परिवर्तन व बंडखोरीची तयारी सुरु झाली होती, असा दावाही देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, कैलास पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदारांची भेट नाकारल्याचा आरोप साफ चुकीचा असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा ठाकरे आम्हाला खूप वेळ द्यायचे. याउलट मंत्रीच आम्हाला वेळ देत नव्हते.

Exit mobile version