Download App

CM शिंदेंचे थेट शिवसेना भवन लक्ष्य; ठाकरेंचा पडद्यामागील शिलेदार लावला गळाला

Amol Matkar joins Shinde group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आमदार, खासदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अन्य महत्वाचे नेते गळाला लावले होते. आता त्यांनी यापुढे जात थेट शिवसेना भवनालाच लक्ष्य केलं आहे. शिवसेना (UBT)च्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत आणले आहे. (shivsena bhawan employee amol matkar joins eknath shinde group)

शिवसेना भवनात पडद्यामागून काम करणाऱ्या या तरुणांनी चांदिवलीमधील एका जाहीर कार्यक्रमात शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश केला. यामध्ये अमोल मटकर, अमित शिगवण, अविनाश मालप, प्रथमेश चाचले या तरुणांचा समावेश आहे. यातील अमोल मटकर यांच्या शिवसेना (UBT) सोडण्याने मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

शरद पवारांना मोदींच्या मंत्रिमंडळातील ‘हा’ नेता आवडतो

कोण आहे अमोल मटकर?
शिवसेना (UBT) सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे विश्वासू म्हणून अमोल मटकर यांना ओळखले जात होते. शिवसेनेचे इव्हेंट्स, सोशल मीडिया आणि डिझायनिंग टीममध्ये त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. दरवर्षीचा दसरा मेळावा, शिवसेनेचा वर्धापनदिन आणि मार्मिकचा वर्धापन दिन या कार्यक्रमांच्या आयोजनाची आणि व्यासपीठाच्या नेपथ्याची जबाबदारी अमोल मटकर यांच्या खांद्यावर असायची. तसेच पक्षाचे पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडियावरचे मिम्स, कार्ड्स, फोटोज आणि व्हिडिओजच्या डिझायनिंमध्येही त्यांची महत्वाची जबाबदारी होती.

Kolhapur : दंगलीमागे उद्धव ठाकरेंचा हात; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

2012 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे गाजलेले स्लोगन ‘होय, करून दाखवलं !’ हे मटकर यांच्याच संकल्पनेतून साकारले होते. या स्लोनगचे कॅम्पेन अमोल मटकर यांनी यशस्वी करुन दाखविले होते. या स्लोगनची शिवसेनेला मुंबई महापालिकेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी मोठी मदत झाली होती. याशिवाय शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये आलेल्या शिवशाही एसटी बसेसवरचे महाराष्ट्रभर गाजलेले लोगो, स्वातंत्राचा अमृत महोत्सवाचा मराठी लोगो हे त्यांनीच डिझाईन केले होते. त्यामुळेच एक अत्यंत कल्पक आणि कुशल तरुण शिंदेंनी त्यांच्या ताफ्यात आणला असल्याचं बोललं जात आहे.

Tags

follow us