Download App

CM शिंदेंना शिवीगाळ करणं भोवलं; ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक

मुंबई : भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (29 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता त्यांना अटक केली आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leader and former mayor Datta Dalvi arrested for abusing Chief Minister Eknath Shinde)

काय आहे प्रकरण?

भांडूपमध्ये रविवार (26 नोव्हेंबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या विशेषणावरुन त्यांना शिवीगाळ केली, असा आरोप शिवसेनेने (शिंदे गट) केला होता. यानंतर भूषण पलांडे यांनी भांडूप पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता दळवी यांना राहत्या घरातून अटक केली. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Tags

follow us