Download App

भाजपात असतानाही…; शिंदेच्या ताफ्यात जाताच कायंदेंनी धनुष्यातून सोडले गौप्यस्फोटांचे बाण

  • Written By: Last Updated:

Manish Kayande Press : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर अनेकांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काल (दि. 18) ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदेंनी (Manisha Kayande) ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कायदेंचा हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच कायदेंनी त्यांच्या धनुष्यबाणातून ठाकरे गटासह अनेक गौप्यस्फोटांचे बाण सोडत हल्लाबोल केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

बावनकुळे हे गांभीर्याने घेण्यासारखे राजकारणी नाहीत; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

कायंदे म्हणाल्या की, मी भाजपात असतानाही शिवसेनेचंच काम केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.  माझा राजकीय प्रवास खूप असून, मी पूर्वी २५ वर्षं भाजपात काम केल्याचे त्या म्हणाल्या. मी सर्वात आधी मतदार म्हणून शिवसेनेलाच मतदान केल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. मी जरी भाजपात होते, तरी निवडणुकीच्या वेळी मी सातत्याने शिवसेनेचंच काम केलं. शिवसेनेची व भाजपाची विचारधारा समसमानच होती. त्यामुळे भाजपातून शिवसेनेत आले तेव्हा माझी विचारधारा तीच राहिली, असं त्या म्हणाल्या. ‘मी 2012 साली शिवसेनेत प्रवेश केला. तो बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत. मी आताही त्याच शिवसेनेत आहे त्यामध्ये कोणताही बदल केला नाही. फक्त शिवसेनेच्या नेतृत्वात बदल झाला आहे.

Ayodhya Poul News : कोण आहेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ?

तरीदेखील पक्षाची साथ दिली
पुढे बोलताना कायंदे म्हणाल्या की, मविआ आम्हाला कधीच पसंत नव्हती. एवढेच नव्हे तर, पक्षश्रेष्ठींनीदेखील ही आघाडी पसंत नव्हती. मविआत पक्षाचा बचाव मनापासून करता येत नव्हता. मविआची विचारधारा पूर्णपणे वेगळी होती, तरी देखील आम्ही पक्षाची साथ दिली. मला पक्षात चांगलं पद हवं होतं जेणेकरून मला मनासारख काम करता यावं. पण मला मनासारख पद दिलं नाही, काम करण्याची संधी दिली नाही त्याची खंत वाटते असेही कायंदे म्हणाल्या.

एक चांगल पद द्या..

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपण शिंदेंना मनमोकळेपणाने काम करण्यासाठी तुमच्या संघटनेत एक चांगलं पद द्या एवढीच मागणी केल्याचे कायंदे यांनी सांगितले. ठाकरेंनी आपल्याला संभाजीनगरचं महिला प्रमुख केलं, विदर्भातील दोन जिल्ह्यांची जबाबदारीही दिली होती. यात कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होणे अपेक्षित नव्हते. परंतु, एखादी ज्युनिअर व्यक्ती येऊन तुम्हाला हुकूम सोडायला लागते, हे मला आवडले नाही. याबाबत आपण भाष्यदेखील केले होते. पण त्याकडे कानाडोळा करण्यात आल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. कायंदेंची ही खंत व्यक्त करताना नेमका रोख कुणाकडे होता. हे मात्र समजू शकलेले नाही. मात्र, त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना सुरूवात झाली आहे.

 

Tags

follow us