Download App

भुजबळांना भडक वक्तव्य करण्याची सवय; अजितदादांनी वेळीच लक्ष घालावं

Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मुद्यावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या प्रकरणी उघडपणे ओबीसी समुदायाला एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. (Maratha Reservation) परंतु ओबीसींच्या आरक्षणाला तीळमात्र धक्का लागणार नाही. भडक वक्तव्य करण्याची भुजबळ यांची जुनी सवय आहे. अजितदादांनी वेळीच लक्ष घालावं, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी यावेळी केली आहे.

मुंख्यमंत्र्यांसोबत आरक्षणासंदर्भात चर्चा करणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न योग्य प्रकारे हाताळल्याचं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले. कोणाचंही आरक्षण काढून कोणालाही आरक्षण देणार नाही. भुजबळ यांनी जाती-जातींमध्ये संभ्रम करू नये. भुजबळ यांनी काल केलेलं वक्तव्य चुकीचं, कुणबी प्रमाणपत्राबाबत नियमावली ठरवली असून उद्या (8) आमची भूमिका शिंदेसमोर मांडणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

छगन भुजबळांच्या पोटातलं ओठावर आलं
मराठा समाज जास्त काही मागत नाही, आपल्या हक्काचं बोलत आहे. मनोज जरांगेंची भेट घेणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर भुजबळांनी टीका केली होती, त्याला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावर भुजबळांनी पोलिसांची बाजू घेऊन आपल्यावर टीका केली. मी तर म्हणतोय की याची सखोल चौकशी करा. तुम्ही जे बोलताय ते खरं असेल तर तुमच्या सरकारकडून चौकशी करा. जे या प्रकरणात बडतर्फ व्हायला पाहिजे होते, ते बाजूलाच राहिलेत आणि कारवाई दुसऱ्या पोलिसांवरच केली.

Chagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्र देणारे सत्तेतून जातील; भुजबळांच्या विधानाने खळबळ

तेलंगणा निवडणूक आहे म्हणून पुरावे मिळत नाही म्हणता, मग 2 दिवसात कसे मिळाले. 13 हजार पुरावे मिळाले म्हणता?, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे. आरक्षण संपवण्याचा घाट सुरु आहे. मंत्रालयापासून खालीपर्यंत सगळीकडे हे सुरु आहे. आवाज उठवणं गरजेचं आहे. कुणबींना आरक्षण मिळावं, पण सरसकट मराठ्यांना नको. तुम्ही मतांसाठी हे करत असाल तर ओबीसींची मतं तुम्हाला नको का?, मराठे म्हणतात भुजबळांना मतदान देऊ नका, मग ओबीसींनीही तसा विचार केला तर?, ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. यात अनेकांचा समावेश. मतांसाठी सर्व सुरू असेल तर तुम्हाला ओबीसींची मतं नको का? असे भुजबळ म्हणाले.

Tags

follow us