Thane News : ठाण्यातील बाळकुम भागात इमारतीची लिफ्ट कोसळली आहे. यात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार गंभीर जखमी आहे. हे सर्व कामगार हे त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
‘मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं’; आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ
बाळकुममधील रुग्णवाल आयरीन नावाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तब्बल चाळीस मजली इमारतीच्ा छतावर वॉटरप्रुफिंगचे काम सुरू होते. रविवारी सात वाजण्याच्या सुमारास काम संपून कामगार हे लिफ्टने खाली उतरल होते. त्याचवेळेस लिफ्टचा दोर तुटला. त्यामुळे हे लिफ्ट थेट खाली कोसळून कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती मिळतात अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू करण्यात आले.
जसं जालियनवाला बाग काडं झालं, तसं ‘जालन्या’वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात
बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. परंतु पाचही कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यातील एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर एकाची जीवन मृत्यूशी लढाई सुरू आहे.
यातील मृतांची ओळखही पटली आहे. महेंद्र चौपाल (३२ वर्षे ), रूपेश कुमार दास (२१), हारून शेख (४७ ), मिथलेश (३५), कारिदास (३८ ) अशी त्यांची नावे आहेत. तर एकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सुनील कुमार दास (२१) हा कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.