Download App

माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

  • Written By: Last Updated:

कल्याण : नाशिकमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचै 84 वर्षीय माजी कुलगुरू अशोक प्रधा (Ashok Pradhan) यांच्यावर राहत्या घरात घसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील कर्णिक रोडवरील त्यांच्या बंगल्यात निलंबित प्राध्यापकांसह सहा जणांनी हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, आता पोलिसांनी (Police) यातील दोन आरोपींना ताब्यात घेतलं.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैश साळवी यांनी सांगितलं की, प्रा. प्रधान यांना मारहाण केल्याप्रकरणी पुरवणी जबाब नोंदवण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. संजय जाधव असं अटक केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

सारा तेंडुलकरच्या नावाने फेक अकाऊंट, असलीपेक्षा 1 लाख जास्त फॉलोअर्स 

माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. प्रधान यांनी रविवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध मारहाण, घर फोडणं, डांबून ठेवणे असे गुन्हे नोंदवले होते. माजी कुलगुरूंना मारहाण केल्याने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका शिक्षण क्षेत्रातील अनेक मंडळींनी घेतली आहे.

अमेरिकेने हाणून पाडला गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशाारा 

शिक्षण क्षेत्रात योगदान व्यक्तीवरील हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी घेऊन ठाणे पोलीस आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी मंगळवारी प्रधान यांचा जबाब नोंदवला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रधान यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून पत्नीला फरफटत नेणं, त्यांना बांधून ठेवणे, पैशांची मागणी करणे असे प्रकार कैद झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींवर नव्यानं कलमं लावली आहेत. त्यानंतर हल्ला करणाऱ्या बडतर्फ प्राध्यापकाला त्याच्या साथीदारासह महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. उर्वरित फरार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Tags

follow us