Download App

मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

  • Written By: Last Updated:

मुंबईः मीरा-भाईंदर येथे उत्तर भारतीयांच्या वतीने आयोजित गोवर्धन पूजा सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde), भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केलाय. गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे पंतप्रधान म्हणतात. मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.

भाजपच्या आमदार-खासदारांना एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय का? अतुल लोंढेंचा सवाल

उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व देशातून लोक मुंबईला कामासाठी आले आहेत. कष्टासाठी आले आहेत. उत्तर भारतीय, गुजराती समाज मुंबईत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातला उद्योग नेत आहेत. गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे ते सांगत आहे. मग मुंबईत, महाराष्ट्रात आलेल्यांनी काय करायचे आहे. मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का ? आपल्या देशात दुसरे राज्य नाही का ? केवळ एकटा गुजरात राज्य मजबूत झाल्यावर देश मजबूत होणार आहे का ?

नागरिकांनो काळजी घ्या, राज्यात JN.1 व्हेरियंटचे 10 रुग्ण, पुण्यात दोन रुग्णांची नोंद


उत्तर भारतीय आणि मराठी माणसात मिठाचा खडा कोण टाकतंय ?

उत्तर भारतीय आणि मराठी माणूस दूध आणि साखरेसाठी एकत्र राहत आहे. दूध आणि साखरेमध्ये मिठाचा खडा कोण टाकत आहे. राम मंदिर निर्माण होत आहे ही गर्वाची गोष्ट आहे. कधी उत्तर भारतीय माझ्या घरी येतात. चांगले मराठीत बोलतात. त्यांना विचारल्यावर ते उत्तर प्रदेशमधील आहे असे सांगतात. परंतु आता मुंबई हेच गाव झाल्याचे सांगतात. चांगली गोष्टी आहे. निवडणुका जवळ आल्या की तुमच्या गावातून लोकांना आणले जाते. गावातील मुखिया आणले जाते. त्यांच्या पार्टीचे ते असतात. ते वस्तीत येईन ब्रेन वॉश करतात. पाच वाजल्यानंतर वोटिंग मशीन बंद होतात. त्यानंतर गावाकडून निघून जातात. निवडणूक आल्यानंतर ब्रेन वॉश करतात. दूध आणि साखरेमध्ये मिठाचा टाकणाऱ्यांपासून दूर राहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

follow us