Download App

भाजपला आमच्या मैत्रीची किंमत कळली नाही : उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्याला सांगितले

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray Met K. C. Venugopal : काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकाही केली. भाजपला आमच्या मैत्रीची किंमत कळली नसल्याचा टोलाही लगावला आहे.

Breaking! उद्धव ठाकरेंना दिल्लीचे निमंत्रण, राहुल गांधी, सोनिया गांधींना भेटणार

काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. ठाकरे हे राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेतील. या भेटीत पुढील राजकीय चर्चा होईल. त्यानंतर राहुल गांधी हे मुंबईत येतील, असे वेणुगोपाल यांनी जाहीर केले. तर हुकुमशाहीविरोधात उद्धव ठाकरे लढत असल्याचे वेणुगोपाल म्हणाले.

महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन कमळ, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

ठाकरे म्हणाले, माझ्या पक्षात गद्दारी करवली आता इतर पक्षात गद्दारी करवतील. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. मागे भाजपचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न करत आहे. भाजपला सत्तेचा हव्यास सत्ताभक्षक झाल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.

लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो एक नाते निर्माण होतो. भाजपसोबत २५-३० वर्ष होतो. पण आता त्यांना किंमत नव्हती. पण ठीक आहे. त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत ते आपल्याला साथ देतील. आमच्या भेटीगाठी सुरू राहतील, असे ठाकरे म्हणाले.

Tags

follow us