Download App

Mumbai : अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला; CM शिंदेंच्या आमदारकीसाठी साकडं घातलं?

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिवर्षाप्रमाणे आज (23 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. गेल्यावर्षीही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. (Union Home Minister Amit Shah visited the Lalbagh Raja)

अमित शाह यांची लालबागच्या राजावर विशेष श्रद्धा आहे. मागील अनेक वर्षांपासून ते नित्यनिमाने दरवर्षी गणेशोत्सवामध्ये मुंबईला येत असतात. त्याचप्रमाणे आज त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तिथून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतले. त्यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. संध्याकाली मुंबई विद्यापाठीत लक्ष्मणराव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमाला उपस्थित राहून ते रात्री दिल्लीला रवाना होतील.

तीन महिने विधानसभा अध्यक्षांनी काय केलं; रोहित पवारांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

एकनाथ शिंदेंच्या आमदारकीसाठी साकडं घातलं?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. त्यानंतर अध्यक्षांनी अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 18 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.

सर्वोच्च न्यायालयानं दट्ट्या लावल्यानंतरच सुनावणीला वेग; अनिल परब यांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

यानंतर शिवसेना (UBT) चे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री शिंदे  यांच्यासह बंडखोरी केलेले विधानसभेतील 16 आमदार निकाल लागून अपात्र होतीलच असं म्हंटलं आहे. ते, म्हणाले, आमच्या म्हणण्याप्रमाणे वरच्या सभागृहातले तीन आमदार सुद्धा अपात्र होणार आहेत. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दट्ट्या मारला, तेव्हा सुनावणी सुरू होते. अजून सुनावणी सुरू झालेली नाही. फक्त पहिल्या नोटीसा निघाल्या. काहीही कारणे देऊनन आम्हाला कागदपत्र मिळाली नाहीत असं सांगून वेळ मारून नेली, असा हल्लाबोलही परब यांनी केला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या आमदारकीसाठी अमित शाह लालबागच्या राजाला साकडं घातले का? असा सवाल विचारला जात आहे.

Tags

follow us