Download App

Vande Bharat : .. म्हणून फडणवीस यांनी मानले पीएम मोदींचे आभार; पहा, काय घडले ?

मुंबई – मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी देशातील नवव्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat) रेल्वेला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. वंदे भारत जलद ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी (Shirdi) या मार्गांवर धावणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

फडणवीस म्हणाले, की आज यानिमित्ताने राज्यात जलद रेल्वेसेवा सुरू आहेत. राज्यातील रेल्वेसाठी (Railway) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल १३ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे राज्यातील रेल्वेचे आधुनिकीकरण अतिशय वेगात होणार आहे. राज्यातील जवळपास १२४ रेल्वे स्टेशन्सचे आधुनिकीकरण होत आहे, हे महत्वाचे आहे. ही रेल्वे राज्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेच्या वतीने मोदी यांचे फडणवीस यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की वंदे मातरम् ट्रेनचे उदघाटन हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे विभाग दुर्लक्षित होता. या अर्थसंकल्पात त्यांनी मोठी तरतूद केली. महाराष्ट्राला कधीही 13500 कोटी रेल्वेला मिळाले नव्हते. हे पहिल्यांदा झाले आहे. मुंबईचे सर्व प्रकल्प, रेल्वे, विमानसेवा, सर्व रस्ते याला सहकार्य मिळत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले आहेत. मुंबई मेट्रो शुभारंभ झाला. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाचा लाखो लोक लाभ घेत आहेत. आजच्या वंदे भारत ट्रेन उदघाटनाने ही लाखो लोकांना लाभ होईल.

Tags

follow us