Download App

‘मुंबईत कायदा अन् सुव्यवस्थेचे धिंडवडे, राज्यात जे घडतंय ते…’; सैल अली खानवरील हल्लानंतर वर्षा गायकवाड आक्रमक

मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तसंच महाराष्ट्रात जे घडतंय, ते धक्कादायक आहे - वर्षा गायकवाड

  • Written By: Last Updated:

Varsha Gaikwad : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला झाल्याची घटना समोर आली. सैफ अली खान त्याच्या घरी असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेत तो जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेवरून खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

‘इलू इलू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, एली अवराम मराठी चित्रपटात करणार पदार्पण 

मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तसंच महाराष्ट्रात जे घडतंय, ते धक्कादायक आहे, अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला.

वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, आज सकाळी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली. मुंबईत अशा प्रकारची घटना घडणं हे दुर्दैवी आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं हे उदाहरण आहे. कारण अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला झाला. त्याआधी वांद्रे परिसरात तीन मोठे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांच्या ऑफिसबाहेर त्यांच्यावर हल्ला झाला होता, दुर्दैवाने त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला झाला होता. आता सैफ अली खानच्या घरात घूसून हल्ला झाला, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं, आता लोक चाकू, कोयदे घेऊन फिरू लागले आहेत. घरात घुसून लोकांना मारत आहेत, हे महाराष्ट्रात काय चाललंय, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.

प्रजासत्ताक दिन विशेष! महिला सशक्तीकरणाची प्रेरणादायी कथा, ‘सौभाग्यवती सरपंच’ चा ट्रेलर लाँच 

पुढं त्या म्हणाल्या की, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी जास्त लोकांचा वावर आहे, त्या परिसरात अशा घटना घडू लागल्या आहेत. मुंबईचे पोलिस स्कॉटलॅंड पोलिसांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे पोलिस दल मानले जाते. अशा घटनांवेळी प्रश्न पडतो की मुंबई पोलिस काम करतात का? गृह विभाग काम करतोय का? असा सवाल गायकवाड यांनी केला.

आज गृहविभागावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, गृहमंत्री फडणवीसांना यावर उत्तर द्यावं लागेल. कारण, ज्या लोकांना पोलिस संरक्षण आहे, तसेच स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे. पण तरीही अशा घटना घडत आहेत. सुरक्षा असलेली लोक सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.

follow us