Download App

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होताच वर्षा गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल

Mumbai Congress : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बदलाचे वारे वाहत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राज्यात खांदेपालट केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. (Varsha Gaikwad’s criticism of Modi after his election as Mumbai Congress president)

त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील काँग्रेसच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी आज सोपवली गेली आहे, हे केवळ काँग्रेसमध्येच घडू शकते. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आजचा हा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक असून मी कृतकृत्य झाले आहे. काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ राहून माझ्या वडिलांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत जनसेवेत स्वतःला झोकून दिले होते. आज तीच जबाबदारी सांभाळण्याची संधी मला देखील देण्यात आली आहे, यासाठी मी पक्षश्रेष्ठींची कायम ऋणी राहीन.

IAS Anil Ramod: पुण्यातील अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे ‘घबाड’ ! पैसे मोजताना सीबीआय अधिकाऱ्यांची दमछाक

त्या पुढं म्हणाल्या की सध्याच्या घडीला एकीकडे आपल्या लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवण्याचे अभद्र काम सुरु असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र खोटेपणाचे विणलेले जाळे आणि द्वेषाचे चक्र मोडून काढण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी सातत्याने झटत आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने मुंबईसह देशभरात नवीन आशेची ज्योत पेटवली आहे.

“हम सब एक हैं”, या विचारधारेतुन प्रेरित माझ्या वडिलांनी राजकारणातून समाजकारणाचा मार्ग आयुष्यभर अवलंबला. एकता, सामाजिक विकास आणि सौहार्दाचे राजकारण नेहमीच द्वेषाहुन सरस ठरते, त्यावर विजय मिळवते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. आणि यावर माझाही विश्वास आहे. मागील अडीच वर्षांत भाई जगताप यांनी मोठ्या ताकदीने आणि सक्षमपणे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले, असे त्यांनी म्हटले आहे.

Tags

follow us