Download App

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये 175 संशयित ताब्यात

Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय

  • Written By: Last Updated:

Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात तब्बल 175 संशयितांना ताब्यात घेतले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अनंतनाग पोलीस, लष्कर, सीआरपीएफ (CRPF) आणि इतर एजन्सींच्या संयुक्त पथकांनी जिल्ह्यात शोध मोहीम सुरु केली आहे. या कारवाई अंतर्गत सुरक्षा दल संशयित लपण्याची ठिकाणे आणि समर्थन नेटवर्क्सना टार्गेट करत आहे.

तर या कारवाई अंतर्गत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले तसेच दहशतवाद्यांना मदत करणारे समर्थन नेटवर्क उध्वस्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत 175 संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.

22  एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर सरकारने देखील पहलगाम येथे सुरक्षेत काही चुक झाली असल्याची कबुली दिली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करण्यास सुरुवात झाली असून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने देखील कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात 5 हजारांहून अधिक पाकिस्तानी, नागपूरमध्ये सर्वाधिक; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

केंद्राने भारतात असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहे तर 29 एप्रिलनंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे आदेश देखील केंद्र सरकारने दिले आहे. याच बरोबर पाकिस्तानसोबत असणारा सिंधू पाणी करार देखील सरकारकडून तोडण्यात आला आहे.

मोठी बातमी! राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी होणार

follow us