‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय’; 21 निवृत्त न्यायाधीशांचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र

21 Retired Judges write to Chief Justice of India (CJI) Dy Chandrachud : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या 21 निवृत्त न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. पत्रात या सर्वांनी काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी न्यायव्यवस्थेवर दबाव आणत असल्याचे उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे.  संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन हे […]

Letsupp Image (13)

Letsupp Image (13)

21 Retired Judges write to Chief Justice of India (CJI) Dy Chandrachud : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या 21 निवृत्त न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. पत्रात या सर्वांनी काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी न्यायव्यवस्थेवर दबाव आणत असल्याचे उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे.  संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन हे घटक अशा प्रकारची कृत्ये करत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. ‘काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अवमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याबाबतही या निवृत्त न्यायाधिशांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या पत्रात निवृत्त न्यायमूर्तींनी पत्रात नेमक्या घटना कोणत्या याबाबतचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. भ्रष्टाचारप्रकरणी काही विरोधी नेत्यांवर सध्या केंद्र सरकारकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या पत्रावर एकूण 21 माजी न्यायमूर्तींनी स्वाक्षरी केली असून, यात सर्वोच्च न्यायालयाचे चार माजी न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या 17 माजी न्यायाधीशांचा समावेश आहे.

माजी न्यायमूर्तींनी पत्रात लिहिले आहे की, ‘काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अवमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कृत्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या अखंडतेचा अनादर तर होतच आहे, शिवाय न्यायाधीशांच्या निःपक्षपातीपणाच्या तत्त्वांनाही आव्हान मिळत आहे. या सर्व घडामोडींमध्ये आम्ही न्यायव्यवस्थेच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत आणि तिचा सन्मान आणि निष्पक्षता जपण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. आम्हाला आशा आहे की, तुमचे मार्गदर्शन आणि नेतृत्व या आव्हानात्मक काळात न्याय आणि समानतेचा आधारस्तंभ म्हणून न्यायव्यवस्थेचे रक्षण करेल.

पत्र लिहिणाऱ्यांध्ये कोण कोण? 

सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र पाठवणाऱ्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे चार माजी न्यायमूर्तीं दीपक वर्मा, कृष्णा मुरारी, दिनेश माहेश्वरी आणि एमआर शाह यांचा समावेस आहे. याशिवाय यात 17 माजी न्यायमूर्ती वेगवेगळ्या उच्च न्यायालयांशी संबंधित आहेत. यात प्रमोद कोहली, एस.एम. सोनी, अंबादास जोशी, एस.एन. धिंग्रा, आरके गौबा, ज्ञान प्रकाश मित्तल, अजित भरिहोके, रघुवेंद्र सिंग राठोड, रमेश कुमार मेरुतिया, करम चंद पुरी, राकेश सक्सेना आणि नरेंद्र कुमार यांची नावे आहेत. तसेच या यादीत उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राजेश कुमार, एसएन श्रीवास्तव, पीएन रवींद्रन, लोकपाल सिंह आणि राजीव लोचन यांचीही नावे आहेत.

Exit mobile version