Download App

धक्कादायक! वर्गात उपस्थितीच्या कमी प्रमाणामुळे निलंबित : विद्यार्थ्याने उचलले अत्यंत टोकाचे पाऊल

बंगळुरू : येथे 22 वर्षीय विद्यार्थ्याने वर्गातील उपस्थितीच्या कमी प्रमाणामुळे निलंबित झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखिल सुरेश असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने चंद्रा लेआउट या राहत्या शेअरिंग रुममध्येच झोपेच्या गोळ्या खाऊन हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( 22-year-old student died by suicide in Bengaluru allegedly after he was suspended from his college)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, याबाबत मिळालेली अधिक माहिती अश की, निखिल सुरेश हा एमसीसी कॉलेज हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तर चंद्रा लेआउटमध्ये दोन मित्रांसोबत तो शेअरिंग रुममध्ये राहत होता. मात्र मागील काही दिवसांपासून तो नियमित वर्गात उपस्थित राहत नव्हता. याच कारणावरुन त्याला यापूर्वी समजही देण्यात आली होती. मात्र त्याची उपस्थिती वाढली नाही. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली.

सुनील केदार यांचा मुक्काम कोठडीतच; जामीन अन् शिक्षेला स्थगिती न्यायालयाने नाकारली

निखिलची वर्तणूक, अनुशासनहीनता आणि वर्गात गैरहजर राहणे या कारणावरुन त्याला महिन्याभरापूर्वी निलंबित केले. याच गोष्टीमुळे तो नैराश्येतही गेला होता. याला त्रासून त्याने गुरुवारी (28 डिसेंबर) राहत्या घरी त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या. रुमवरील विद्यार्थ्यांना सगळा प्रकार लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत बनीरघट्टा पोलीस स्थानकात आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us