Download App

शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर; भाजप आमदाराकडून उकळले कोट्यावधी रुपये

1 Crore 66 lakhs bribed to BJP MLAs by luring them for ministership : राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित असतानाच राज्यातील काही आमदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud of Rs) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP National President JP Nadda) यांचे स्वीय सहायक असल्याचे सांगितले होते.

मी जेपी नड्डा यांचा स्वीय सहायक आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. नव्या मंत्रीमंडळात तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला 1 कोटी 66 लाख रुपये द्यावे लागतील, असं सांगून एका भामट्याने भाजपचे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला.

मंत्रिपदाची लालूच दाखवून आमदारांकडून 1 कोटी 66 लाख रुपये उकळणाऱ्या या भामट्याचे नाव नीरजसिंग राठोड असे आहे. त्याला अटक करण्यात आली असून तो मुळचा अहमदाबादमधील आहे. मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या नीरजसिंग यांने भाजपचे आमदार विकास कुंभारे, आ. टेकचंद सावरकर, आ. तानाजी मुरकुटे, आ. नारायण कुचे आणि आमदार राजेश पाडवी यांना पैशाची मागणी करण्यात आली.

Shah Rukh Khan: भर कार्यक्रमात किंग खानचं बायकोबद्दलचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत? पाहा Video

दरम्यान, अन्य काही आमदारांनी भामट्याचे दावे सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिली. तर काही आमदारांना नीरजसिंगचा डाव कळला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नीरजसिंगला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला गुरजारतमधील मोरबीमधून अटक करण्यात आली आहे.

भाजपचे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना ७ मे रोजी एक कॉल आला होता. त्यांना नीरजसिंह राठोड या भामड्याने मंत्रीपदाचे आमिष दाखवून पैशांची मागणी केली. मात्र विकास कुंभारे यांना संशय आला. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या फोन कॉलची माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.

विशेष म्हणजे फसवणुकीचे हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादिन नाही, तर आंतरराज्य स्वरूपाचे आहे. कारण, गोव्याचे प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष नीरजसिंगने दाखविले.

मंत्रिपदाच्या देण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रातील किती आमदारांची या भामड्याने फसवणूक केली आहे, हे तपासानंतरच कळेल. मात्र, महाराष्ट्रातील पाच आमदारांना गंडा घालण्याचा नीरजचा डाव होता, हे सध्या समोर येतं आहे. आता पैशाच्या बदल्यात मंत्रिपद, आमदारांची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितले की, मला काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता. आणि सांगण्यात आलं की, तुमचा मंत्रिमंडळात समावेश आहे. तेव्हा आसामधील निवडणुका सुरू होत्या. मला संबंधित व्यक्तीने सांगितलं की, आपल्या एका उमेदवारांला निवडुण आणायचं आहे. त्यासाठी तुम्ही त्याला काही मदत करा, अशा प्रकारे पैशाची मागणी केली. जेव्हा त्यांनी पैशाची मागणी केली. तेव्हा लक्षात आलं की, हे काहीतरी गडबड आहे. त्यामुळं मी नंतर मी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानेही मला फोन आला नाही. त्यामुळं त्याची पोलिसात तक्रार दिली नाही, असं सावरकर म्हणाले.

Tags

follow us