Download App

निवडणुकीचे डिपॉझिट भरण्यासाठी आणली चिल्लर, मोजून मोजून अधिकारी वैतागले

  • Written By: Last Updated:

निवडणूक म्हटलं की त्याच्या अनेक चर्चा होतात. कोणी कोणत्या नेत्यांवर टीका केली, याबरोबरच या काळात घडणाऱ्या वेगवगेळ्या घटना घडत असतात. त्याची मोठी चर्चा देखील होत असते. सध्या देशभरात कर्नाटक निवडणुकीची चर्चा आहे. या कर्नाटक निवडणुकीत अशी एक घटना घडली आहे. ज्याची सध्या मोठी चर्चा चालू आहे.

कर्नाटकमधील यादगीर विधानसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक अर्ज दाखल करताना डिपॉंझिट भरण्यासाठी एक एक रुपयाची चिल्लर आणली. निवडणुक लढताना प्रत्येक उमेदवाराला अनामत फी म्हणून 10,000 रुपये भरावे लागतात. यादगीर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना अपक्ष उमेदवार यंकप्पा यांनी ही चिल्लर आणली होती.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

यंकप्पा यांनी अधिकाऱ्यांना 10,000 रुपयांची ठेवीची रक्कम संपूर्णपणे एक रुपयाच्या नाण्यांमध्ये भरून दिली, जी त्यांनी  कर्नाटकातील मतदारांकडूनच गोळा केली होती. यंकप्पा यांनी टेबलावर पसरलेली नाणी मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना दोन तास लागले.

यंकप्पा यांनी लोकांकडून पैसे मागताना सांगितले होते की, “फक्त एक रुपया नाही, तर तुमच्या एका मताने आणि मला एक दिवस दिलेल्या मताने मी तुम्हाला गरिबीतून मुक्ती देईन.” त्यांनी संपूर्ण मतदारसंघात पायी प्रवास केला आणि मतदारांकडून चिल्ल्लर गोळा केली आहे.

यंकप्पा हे कलबुर्गी जिल्ह्यातील गुलबर्गा विद्यापीठातून कला पदवीधर असून त्याच्याकडे एकूण 60,000 रुपयांची संपत्ती आहे तर त्याचे वडील देविंद्रप्पा यांच्याकडे एक एकर आणि 16 गुंठे जमीन आहे.

 

Tags

follow us