दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा एकदा अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. बुधवारी (30 ऑगस्ट) एका व्यक्तीने हस्तमैथुन करून अल्पवयीन मुलीवर वीर्यस्खलन केल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिल्ली मेट्रोच्या रेड लाईनवरील एका मेट्रोच्या डब्याच्या ही घटना घडली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दखल झाला आहे. (A man has been arrested for masturbating and ejaculating on a minor girl travelling in Delhi Metro)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रक्षाबंधन आणि सुट्टीमुळे मेट्रोला तुफान गर्दी होती. अशात पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या प्रवाशाने हस्तमैथुन करत एका अल्पवयीन मुलीवर वीर्यस्खलन केले. या घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरुन गेली. त्यावेळी तिची आईही तिच्यासोबत प्रवास करत होती, मात्र जागा मिळेल तिथे बसल्याने आई आणि मुली वेगवेगळीकडे बसल्या होत्या.
घाबरलेली मुलगी आईकडे गेल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. यानंतर मुलीची आई आणि मुलगी सीलमपुल मेट्रो स्टेशनवर उतरली. त्याचवेळी दोन प्रवाशांनी आरोपीला स्टेशनवर पकडले आणि त्याला शाहदरा स्थानकावर मेट्रो अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 294 (अश्लील कृत्ये ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.
दिल्ली मेट्रोमध्ये यापूर्वीही अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कधी बिकीनी घालून प्रवास, तर कधी भर मेट्रोत किसींगचा प्रकार समोर आला होता. यापूर्वीही मेट्रोमध्ये एका मुलाने हस्तमैथून केल्याचे समोर आले होते. याशिवाय याच महिन्यातील 10 ऑगस्टला मंडी हाऊस मेट्रो स्टेशनवरती हस्तमैथून केलेल्या एका 23 वर्षीय मुलाला अटक केले होते. याच वर्षी मे महिन्यात मेट्रोमध्ये ब्लो जॉब करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.