बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू असून त्याचे पडसाद आज दिल्लीत बघायला मिळत आहे. (Bangladesh) बांगलादेशच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयावर हिंदू संघटनांनी मोर्चा वळवला. यावेळी आंदोलक आक्रमक भूमिका घेताना दिसले. मोठी सुरक्षा याठिकाणी वाढवण्यात आली. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अन्यायाविरोधात लोक भारतात आक्रमक होताना दिसत आहेत. रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली जात आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाच्या कार्यालयाबाहेरही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून पोलिसांनाही हे कार्यकर्ते जुमानत नाहीत. बांगलादेशात हिंदूंवर ज्याप्रकारे अन्याय केला जात आहे, त्यानंतर मोठा आक्रोश बघायला मिळत आहे. या घटनांचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही पुढे आली आहेत. मंगळवारी सकाळी बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. या बैठकीत भारताचे उप उच्चायुक्तही उपस्थित होते.
बांगलादेशात मोठी खळबळ! विद्यार्थी नेत्याच्या डोक्यात घातल्या गोळ्या, नक्की काय घडलं?
परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, भारताच्या विविध भागांतील बांगलादेशी दूतावासांच्या आसपास वाढलेल्या सुरक्षा चिंतेमुळे प्रणय वर्मा यांना बोलावण्यात आले होते. बांगलादेशात एका हिंदू तरुणाच्या हत्येच्या विरोधात शनिवारी रात्री दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते की, ही शांतते निदर्शने सुरू आहेत. यादरम्यानच बांगलादेशातील हिंसेवर अमेरिकेचे बारीक लक्ष आहे.
मुहम्मद युनूस यांनी अमेरिकेला सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका फेब्रुवारीत होणार असल्याचे स्पष्ट केले. भारत देखील बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीमध्ये अलर्ट मोडवर आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठी अस्थिरता सध्या बघायला मिळत आहे. बांगलादेशाने यापूर्वीच पाकिस्तानला हाताशी धरून थेट अमेरिकेचे पास पकडले आहेत. आता अमेरिका बांगलादेशातला नक्की किती साथ देते हे देखील बघण्यासारखे ठरणार आहे.
