Download App

आपचे नेते मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडी वाढ; कारण…

नवी दिल्ली : नवीन दारु धोरणात भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. सीबीआयने आज त्यांना ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांनी वाढ केलीय. न्यायालयाने 14 दिवस वाढ केल्याने सिसोदियांना 17 एप्रिलपर्यंत कोठडीत रवानगी असणार आहे.

Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज, मातब्बरांमुळे निवडणूक लक्षवेधी ठरणार

काही दिवसांपूर्वीचे दिल्लीतील आपचे नेते मनिष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या नवीन दारु धोरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आज ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात सिसोदिया यांना हजर करण्यात आले होते. अबकारी घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास महत्वपूर्ण टप्यावर आला असल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सिसोदियांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली होती. त्यानूसार सिसोदियांच्या कोठडीत वाढ करण्यात आलीय.

Ahmednagar Crime : नायब तहसीलदारासह चौघांवर जीवघेणा हल्ला…

मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या नव्या दारु धोरणाबाबत आम आदमी पक्ष आणि भाजपच्या नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु आहे. अशातच सिसोदिया यांना सीबीआयने अबकारी प्रकरणी अटक केली. याचवेळी सिसोदिया यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. त्यामुळे सिसोदिया यांना कोठडीत ठेवल्याने सीबीआयचा हेतू साध्य होणार नसल्याचं सीबीआयच्या युक्तिवादापूर्वी सिसोदिया यांनी जामीन याचिकेच्या सुनावणीदरम्यान सांगितलं होतं.

संयोगीताराजे प्रकरणात संभाजीराजेंची एन्ट्री

मी ‘सीबीआय’च्या तपासात पूर्ण सहकार्य केले. त्यांनी फोन केला तेव्हा ते हजर झाले. मी सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे. हे लक्षात घेऊन मला जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचं मनिष सिसोदिया यांनी स्पष्ट केलं होतं. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाने दणका दिला होता. ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने शुक्रवारी (ता. ३१) त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. त्यावेळी विशेष न्यायाधीश एम. के नागपाल यांनी काही निरीक्षणे नोंदविली होती.

ते सुनावणीत म्हणाले होते की, “मनीष सिसोदिया यांना आता जामीन दिला गेला तर ते तपासावर प्रभाव टाकू शकतात. पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप आहेत. सिसोदिया यांच्या भूमिकेबाबतचा तपास अद्याप पूर्ण व्हायचा आहे, अशा परिस्थितीत सिसोदिया यांची या टप्प्यावर जामिनावर सुटका होऊ शकत नाही. यानंतर कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया आता दिल्ली उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे म्हणाले होते.

Tags

follow us