Download App

‘जगात योग्य संदेश जाणार नाही’ G20चा संदर्भ देत केजरीवालांनी शहांना धाडली चिठ्ठी

Arivind Kejariwal On Amit Shah : उत्तर भारतात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरक्षः थैमान घातले असून, राजधानी दिल्लीत 45 वर्षांत म्हणजेच 1978 नंतर पहिल्यांदाच यमुना नदीच्या पाणी पातळी विक्रमी स्तरावर नोंदवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढता पुराचा फटका आणि यमुनेची वाढत्या पाणीबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली असून, G20 चा संदर्भ देत थेट गृहमंत्री अमित शाहांना चिठ्ठी लिहिली आहे.

केजरीवालांच्या पत्रात नेमकं काय?

केजरीवालांनी शाहांना पाठवलेल्या चिठ्ठीत दिल्लीतील यमुनेची पातळी 207.55 मीटरवर पोहोचली असून, ही पातळी धोक्याच्या पातळीच्या वर असल्याचे म्हटले आहे. सध्या ही पातळी 205.33 मीटरवर असून, याआधी 1978 मध्ये यमुनेची कमाल पातळी 207.49 मीटर होती असे केजरीवालांनी म्हटले आहे. त्यावेळी दिल्लीत पूर आला होता आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. त्यानंतर आता पुन्हा यमुनेने धोक्याची पातळी गाठली आहे.

Crime : राजधानी दिल्ली पुन्हा हादरली : तुकड्या-तुकड्यांमध्ये आढळला युवतीचा मृतदेह

ते पुढे म्हणाले की, केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार यमुनेची पातळी आज रात्री 207.2 मीटरपर्यंत पोहोचेल, ही अतिशय चिंतेची बाब आहे. दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. दिल्लीतील पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत नसून, हरियाणातील हथिनीकुंडमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पाणीपातळी वाढत आहे. तुम्हाहा विनंतरी करतो की, शक्य असल्यास हथिनीकुंडचे पाणी मर्यादित वेगाने सोडावे, जेणेकरुन दिल्लीतील यमुनेची पातळी आणखी वाढू नये.

जी-20 शिखर परिषदेचा दाखला देत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि काही आठवड्यात येते जी-20 शिखर परिषद होणार आहे. देशाच्या राजधानीत आलेल्या पुराच्या बातम्यांनी जगाला चांगला संदेश जाणार नाही. आपण सर्वांनी मिळून दिल्लीच्या जनतेला या परिस्थितीतून वाचवायचे आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले.

‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान

काश्मीर गेटच्या मोनस्ती मार्केट, रिंगरोड, यमुना घाट, यमुना बाजार परिसरात पुराचे पाणी पोहोचले आहे. आयटीओ येथील घाट पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. यमुना नदीलगतचा परिसर अतिशय संवेदनशील आहे. या भागात सुमारे 41 हजार लोक राहतात. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 6 जिल्ह्यांमध्ये बाधित लोकांसाठी सुमारे 2700 तंबू बनवण्यात आले आहे. या तंबूंमध्ये राहण्यासाठी आत्तापर्यंत 27 हजार लोकांनी आपली नोंदणी केली आहे.

Tags

follow us