Download App

‘मुंजा’च्या पहिल्या वाढदिवसाला डान्स वर्कशॉपमध्ये अचानक पोहोचत शर्वरीने दिली चाहत्यांना खास ट्रीट

Munja चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्त, बेलाच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री शर्वरीने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं.

Sharvari gave a special treat to fans by making a surprise visit to the dance workshop on ‘Munja’s’ first birthday : 100 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मुंजा चित्रपटाच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त, बेलाच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री शर्वरी ने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं — एक असा क्षण जो ते आयुष्यभर विसरणार नाहीत.वायरल झालेलं तिचं “तरस” हे गाणं अजूनही सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. शर्वरी एका डान्स वर्कशॉपमध्ये अचानक पोहोचली, जिथे तिचे कट्टर फॅन्स फक्त प्रॅक्टिससाठी जमले होते. पण तिला पाहून सर्व जण भारावून गेले.

नगर जिल्ह्यात महायुती स्वबळावर? राष्ट्रवादीचे आमदार दातेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “आता पक्षाने..”

कोणी आनंदाने ओरडलं, तर काहींच्या डोळ्यांतून अश्रूही आले.चाहत्यांनी तिच्याकडे ‘तरस’ चा हुक स्टेप करण्याची विनंती केली आणि शर्वरी ने ती लगेच पूर्ण केली. ती चाहत्यांबरोबर नाचली आणि त्या गाण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यानंतर चाहत्यांनी तिला एक छोटंसं गिफ्ट दिलं मुंजा चं त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व आहे. हे सांगण्यासाठी एक खास भावनिक क्षण. लगेचच फोटो सेशनही झालं आणि तो दिवस अजून खास बनला.

विधानसभेची ‘मॅच’ खरंच ‘फिक्स’ होती का ? राहुल गांधी विरुद्ध बावनकुळे

शर्वरी म्हणाली:“मुंजा रिलीज होऊन वर्ष झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. बेला सारखी भूमिका करणं ही खूप समाधानकारक गोष्ट होती, पण ‘तरस’ गाण्याला जेवढं प्रेम मिळालं, ते माझ्यासाठी खूपच आश्चर्यकारक होतं. एक नवीन कलाकार म्हणून मला इतक्या मोठ्या स्केलचं डान्स सॉंग मिळणं आणि तेही दिनेश विजन सरांसारख्या दिग्गज प्रोड्यूसरकडून — हे खरंच स्वप्नासारखं वाटलं. हे मोठ्या कलाकारांना मिळणारं क्षेत्र आहे, पण मला ते मिळालं, याचा अभिमान आहे.”

राजकारणाचा ‘खेळ’ शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..

ती पुढे म्हणाली:“मी लहानपणापासून मुंजा च्या कथा ऐकत आले आहे. जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्यामधील कल्पनाशक्ती, डिटेल्स पाहून मी थक्क झाले. भारताचा पहिला CGI पात्र म्हणजे मुंजा कोणताही व्हिज्युअल रेफरन्स नव्हता, आम्ही सगळे केवळ कल्पनेवर काम करत होतो.मराठी लोककथा एका भव्य हिंदी सिनेमाच्या स्वरूपात पाहून मला प्रचंड उत्सुकता वाटली. आदित्य सरपोतदार सरांसारखा डायरेक्टर मिळणं ही पर्वणी होती. आम्ही कोंकणात शूटिंग केलं आणि तेथील बोली, लोक, खाद्यसंस्कृती सगळ्यावर त्यांचं गाढ नियंत्रण होतं.”

आमिर खानच्या घरी ‘सितारे जमीन पर’ टीमसाठी म्युझिकल नाईट! दिग्गजांची सरप्राइझ हजेरी

शर्वरी ने चाहत्यांसोबत झालेल्या खास क्षणावर प्रतिक्रिया दिली:“मुंजा ने १०० कोटींचा टप्पा ओलांडणं आणि आजही त्याचं तितकंच कौतुक होणं. हे एखाद्या स्वप्नासारखं आहे. आज मी चाहत्यांमध्ये गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मन गहिवरून आलं. एकाने मला हुक स्टेप करण्यास सांगितलं आणि मग मीही थांबले नाही. आम्ही एकत्र नाचलो, हसलो, आणि त्यांनी मला एक गोड गिफ्टही दिलं. हे असे क्षण असतात जे मला आठवण करून देतात की मी सिनेमा का करते आणि प्रेक्षकांचा प्रेमाचा अनुभव घेणं किती खास आहे!”

follow us