टीम इंडियातील ‘या’ खेळाडूशी भांडायचा रोहित शर्मा; मजेदार किस्सा अन् खुलासाही..

चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजाराचं पुस्तक 'द डायरी ऑफ ए क्रिकेटर वाइफ'च्या लाँचिंग प्रसंगी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने काही मजेदार किस्से समोर आणले.

Rohit Sharma

Rohit Sharma

Rohit Sharma : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि (Rohit Sharma) चेतेश्वर पुजारा दोघेही दीर्घकाळ क्रिकेट खेळले आहेत. रोहितने जेव्हा कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यावेळी तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी येत होता. तर पुजारा मात्र नेहमी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत होता. एका कार्यक्रमात जेव्हा दोन्ही खेळाडू समोरासमोर आले त्यावेळी त्याने काही गोष्टींचा खुलासा केला. मैदानावर ज्यावेळी पुजारा आणि रोहित शर्मा असायचे त्यावेळी कोण कुठे फिल्डिंग करेल यावरून वाद घालायचे.

चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजाराचं पुस्तक ‘द डायरी ऑफ ए क्रिकेटर वाइफ’च्या लाँचिंग प्रसंगी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) काही मजेदार किस्से समोर आणले. रोहित शर्माने हसतहसत सांगितलं की मैदानात असताना शॉर्ट लेगवर कोण असेल? सिली पॉइंटवर कोण उभं राहील? असा प्रश्न असायचा त्यावेळी पुजारा म्हणायचा मी तीन नंबरवर फलंदाजीसाठी येतो म्हणून मला जास्त आरामाची गरज आहे. म्हणून तू तिथं फिल्डिंग कर.

कसोटीमधून निवृत्ती आता भारतासाठी कधी खेळणार रोहित.. कोहली, जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

यावर पुजारानेही स्मितहास्य करत रोहितला मध्येच थांबवलं म्हणाला, नंतर जेव्हा रोहितने टेस्टमध्ये सलामीला खेळण्यास सुरुवात केली त्यावेळी मात्र सगळंच बदललं. नंतर त्यानं (रोहित शर्मा) सांगितलं मी ओपनर आहे म्हणून आता तू शॉर्ट लेगवर उभा राहा. माझ्याकडे काहीच उत्तर नसायचं मी तिथून निघून जात होतो.

ज्यावेळी गर्दीनं पुजाराला घातला घेराव

यानंतर सन 2012 मधील एक खास किस्साही सांगितला. जेव्ह दोघेही खेळाडू त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे गेले होते. रोहित म्हणाला, पुजारा शाकाहारी जेवणाच्या शोधात रात्री उशिरा हॉटेलातून बाहेर पडला होता. रात्री 9 नंतर कुणीही बाहेर जायचं नाही अशा सूचना असतानाही पुजारा बाहेर गेला होता. बाहेर पडताच त्याला लोकांनी गराडा घातला. मोठ्या मुश्किलीने त्याला गर्दीतून बाहेर काढण्यात आलं होतं.

Cheteshwar Pujara : कौंटी क्रिकेटमध्ये पुजाराचा दबदबा; ठोकले दमदार शतक

Exit mobile version