कसोटीमधून निवृत्ती आता भारतासाठी कधी खेळणार रोहित – कोहली, जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

कसोटीमधून निवृत्ती आता भारतासाठी कधी खेळणार रोहित – कोहली, जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

Team India ODI Schedule For 2025-26 :  भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे. आता दोन्ही खेळाडू भारतासाठी फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI) खेळताना दिसणार आहे. गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय सामन्यांची संख्या कमी झाल्याने पुन्हा एकदा चाहत्यांना भारतासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली कधी खेळताना दिसणार असा प्रश्न पडला आहे.

36 वर्षीय विराट कोहलीने 12 मे रोजी तर रोहित शर्माने गेल्या आठवड्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता चाहत्यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र फक्त एकदिवसीय सामन्यात दिसणार आहे. पण यासाठी चाहत्यांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. नुकतंच 2025-26 मधील भारताचे एकदिवसीय वेळापत्रक (Team India ODI Schedule For 2025-26) समोर आले आहे.

भारतीय संघ ऑगस्ट 2025 पासून डिसेंबर 2025 पर्यंत 9 एकदिवसीय सामने खेळणार आहे. ज्याची सुरुवात बांगलादेश विरुद्ध होणार आहे. भारतीय संघ 17-23 ऑगस्ट दरम्यान बांगलादेशविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. बांगलादेशानंतर भारतीय संघ 19 ते 25 ऑक्टोबर 2025 दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 दरम्यान दक्षिण आफ्रिकाविरोधात 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे.

Bajaj Platina 110 NXT इंजिन अपडेटसह लॉन्च, जाणून घ्या नवीन फीचर्स अन् किंमत

तर 2026 मध्ये देखील भारतीय संघ 15 एकदिवसीय सामने खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर जून महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध  3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. तर वेस्ट इंडिजबरोबर सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड आणि डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube