Rohit Sharma Retirement : रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूला कोण Miss करणार नाही? वीरेंद्र सेहवाग

Virender Sehwag Reaction On Rohit Sharma Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) काल कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यावर आता भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) प्रतिक्रया समोर आली आहे. 38 वर्षीय रोहितने आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Test cricket) निवृत्ती घेतली आहे. सध्या तो भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहील. तो या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार देखील आहे. रोहितच्या या घोषणेनंतर, त्याच्या 11 वर्षांच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीचाही अंत झालाय.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने देखील रोहित शर्माच्या निवृत्तीच्या घोषणेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यासाठी तयारी करत असल्याचं मी ऐकलं होतं. मागच्या वेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळला नव्हता, तेव्हा रोहितने म्हटलं होतं की, मी कुठेच जात नाहीये. इथंच आहे. मी रिटायर्ड होत आहे, असं दाखवू नका. या दरम्यान काय घडलं असेल? या काळात जेव्हा सिलेक्टर्सने निर्णय घेतला, तेव्हा कदाचित रोहित शर्माला टेस्ट मॅचचा कॅप्टन म्हणून घोषित करणार नाही, असं त्यांनी ठरवलं असेल. किंवा इंग्लंडमध्ये प्लेयर म्हणून घेऊन जाणार नाही, असा विचार करत असल्याचं सिलेक्टर्सने रोहित शर्माला सांगितलं असेल. त्याला काही पर्याय दिले असतील, म्हणूनच रोहित शर्माने टिम आणि कॅप्टन जाहीर होण्याअगोदरच निवृत्ती जाहीर केली आहे. हे एक चांगलं संकेत आहे.
परंतु रोहित शर्मासारखा चांगल्या खेळाडूची आठवण कुणाला येणार नाही? वन डे क्रिकेट अन् टेस्ट क्रिकेटमध्ये रोहित चांगलं मनोरंजन देत होता. रोहितने जे रेकॉर्ड्स बनवले आहेत, ते सुद्धा खूप चांगले आहेत. अंडर टेस्ट मॅच खेळणारे काही निवडक खेळाडू आहेत. रोहित अजून काही दिवस खेळला असता तर चांगलं झालं असतं. परंतु जर त्याने निर्णय घेतला आहे, तर ठीक आहे. त्यांचं करिअर खूप चांगलं राहिलं आहे. मिडल ऑर्डरपासून सुरूवात केली होती, सलामीवीर म्हणून निवृत्ती होतेय. रोहितची कारकिर्द खूप चांगली राहिलेली आहे. यश खूप मोठं आहे.
मी इतकंच म्हणेन की, धन्यवाद रोहित. भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितने आधीच टी-20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. आता रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्येही खेळताना दिसणार नाही. रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळत राहील.
रोहितने डिसेंबर 2024 मध्ये मेलबर्नमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारतीय संघ यावर्षी जूनमध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. रोहितला आधीच सांगण्यात आले होते की, त्याची संघात निवड होणार नाही. यानंतर रोहितने निवृत्तीची घोषणा केली.