पाकिस्तान पुन्हा हादरलं! लाहोरमध्ये तीन स्फोट, 3 किमीपर्यंत घुमला आवाज; क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा

Pakistan Claims Missile Attack In Lahore : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये (Missile Attack In Lahore) एकामागून एक तीन स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. आज सकाळी स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. काही स्थानिक स्रोत आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये हा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) कारवाईनंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. याची अधिकृत पुष्टी केली जात आहे.
संपूर्ण लाहोरमध्ये सायरन वाजत आहेत. खरं तर हे स्फोट 7 मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्याच्या एक रात्री आधी झाले आहेत. हे हल्ले 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होते. आता लाहोरमध्ये हे स्फोट ऐकू आले आहेत. संपूर्ण लाहोरमध्ये सायरन वाजत असल्याचे वृत्त आहे. लाहोर विमानतळ बंद करण्यात आले आहे.
आतापर्यंत हे स्फोट पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी किंवा लष्कराने क्षेपणास्त्र हल्ले असल्याचे पुष्टी केलेले नाही. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार या भागात सुरक्षा दल तैनात आहेत. सामान्य लोकांना जवळ येण्यापासून रोखले जात आहे. या स्फोटांनंतर लाहोरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आल्याचे वृत्त आहे. स्थानिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणाच भीतीचे वातावरण पसरले आहे.
यापूर्वी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांच्या तळांवर हवाई हल्ले केले होते. बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह आणि मुरीदके येथेही हल्ले करण्यात आले. पूर्व लाहोरमध्ये मोठा स्फोट ऐकू आला. हे स्फोट इतके मोठे होते की, त्यांचा आवाज तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. हे स्फोट कसे झाले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील युद्धाची भीती वाढू लागली आहे. भारत पाकिस्तानच्या कोणत्याही कृतीला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.