Bajaj Platina 110 NXT इंजिन अपडेटसह लॉन्च, जाणून घ्या नवीन फीचर्स अन् किंमत

Bajaj Platina 110 NXT इंजिन अपडेटसह लॉन्च, जाणून घ्या नवीन फीचर्स अन् किंमत

Bajaj Platina 110 NXT : भारतीय बाजारात बजाजने (Bajaj) आपली लोकप्रिय बजाज प्लॅटिना 110 एनएक्सटी बाईक (Bajaj Platina 110 NXT ) इंजिन अपडेटसह लॉन्च केली आहे. कंपनीने भारतीय बाजारात या लोकप्रिय बाईकचे ओबीडी-2बी अपडेटेड मॉडेल लॉन्च केले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने नवीन बाईकमध्ये जबरदस्त फीचर्स देखील दिले आहे.

या नवीन बाईकमध्ये कंपनीकडून यूएसबी चार्जिंग पोर्ट, फुल डिजिटल कन्सोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तर दुसरीकडे जर तुम्ही ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. कंपनीने नवीन मॉडेलच्या लाँचिंगसह त्याची किंमत देखील वाढवली आहे. आता नवीन प्लॅटिना 2600 रुपये महाग झाली आहे. त्यामुळे या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 74,214 रुपये असण्याची अपेक्षा आहे. कंपनीने प्लॅटिना 110  एनएक्सटी एकाच प्लॅटफॉर्म आणि फ्रेमवर बनवले आहे.

नवीन बजाज प्लॅटिना 110 एनएक्सटीमध्ये हेडलाइटभोवती क्रोम बेझल देण्यात आले आहे. तर बाईकची विजिबिलिटी वाढवण्यासाठी एलईडी डीआरएल देखील या नवीन मॉडेलमध्ये कंपनीकडून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे कंपनीने ही मस्त बाईक रेड-ब्लॅक, सिल्व्हर-ब्लॅक आणि यलो-ब्लॅक या तीन कलर पर्यायमध्ये लॉन्च केली आहे.

BJP Ahilyanagar President :  भाजपच्या नगर शहराध्यक्षपदाचं घोड कुठं आडलं? 

तर आता बाजाज पुन्हा भारतीय बाजारात मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. माहितीनुसार, कंपनी भारतीय बाजारात लवकरच 2025 ची पल्सर NS400Z लॉन्च करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ही बाईक डीलरशिपवर येण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे भाजपचे पुन्हा धीरज घाटेच कारभारी.. बिडकर, भिमालेंच्या पदरी निराशा…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या