Download App

Manish Sisodiya : आपल्या पंतप्रधानांना कोणी पण गंडवतं; जेलमधून सिसोदियांचा मोदींवर हल्लाबोल

Manish Sisodiya Write a letter to PM Modi from Jail :  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जेलमधून देशासाठी पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधानाचे शिक्षण कमी असणे ही देशासाठी शरमेची बाब असल्याचे सिसोदिया म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी यांना शिक्षणाचे महत्व नाही, मागच्या काही वर्षांमध्ये त्यांनी देशभरीतल 60 हजार शाळा बंद केल्या आहेत, असा आरोप सिसोदिया यांनी पत्राद्वारे केला आहे.

या पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींन टोला लगावला आहे. देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान यांचे शिक्षित असणे महत्वाचे आहे. घाण नाल्यामधून गॅस काढून चहा बनवला जाऊ शकतो, असे विधान ज्या वेळेला पंतप्रधान करतात, तेव्हा मला वाईट वाटते, असे सिसोदियांनी म्हटले आहे.

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय

मनीष सिसोदिया यांनी पत्र लिहून मोदींच्या संविधानिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपले पंतप्रधान हे कमी शिक्षित आहेत. त्यामुळे इतर देशातील राष्ट्राध्यक्ष त्यांची गळा भेट घेऊन त्यांच्याकडून कोणत्याही कागदावर सही करुन घेतात. पंतप्रधानांना यातील काहीही कळत नाही कारण ते तर कमी शिक्षित आहेत, असे म्हणत त्यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

ट्विटरचा लोगो पुन्हा बदलला, श्वानाच्या जागी आता…

दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे ईडीने त्यांना अटक केली आहे. सध्या ते जेलमध्ये आहेत. त्यांच्या अटकेवरुन विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Tags

follow us