तामिळनाडूत BJP ला मोठा धक्का, गंभीर आरोप करत दिग्गज अभिनेत्रीचा रामराम

नवी दिल्ली : एकीकडे आगामी लोकसभेत दक्षिण भारतात विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. गेल्या 25 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या तमिळनाडूतील दिग्गज अभिनेत्री गौतमी तडीमल्ला (Gautami Tadimalla) यांनी  भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. एकापत्राद्वारे त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे त्याला पक्षाच्या एका […]

Letsupp Image   2023 10 23T113958.481

Letsupp Image 2023 10 23T113958.481

नवी दिल्ली : एकीकडे आगामी लोकसभेत दक्षिण भारतात विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. गेल्या 25 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या तमिळनाडूतील दिग्गज अभिनेत्री गौतमी तडीमल्ला (Gautami Tadimalla) यांनी  भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. एकापत्राद्वारे त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे त्याला पक्षाच्या एका वर्गाने पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षाने 2021 च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकीट देण्याचे आश्वासन रद्द करूनही आपण भाजपशी वचनबद्ध राहिल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. (Actor  Quits BJP )

Gautami Tadimallaपत्रात नेमकं काय?

पक्षाला रामराम करताना लिहिलेल्या पत्रात गौतमी तडीमल्ला यांनी म्हटले आहे की, अत्यंत जड अंत:करणाने मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी 25 वर्षांपूर्वी पक्षाच्या राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी सामील झाले होते. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांना तोंड देत सर्व गोष्टींचा आणि बंधिलकीचा आदर केला. मात्र, तरीही आज मी माझ्या आयुष्यात अकल्पनीय संकटाच्या परिस्थितीत उभी आहे. पक्ष आणि नेत्यांकडून मला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाही.

गौतमी तडीमल्ला यांचा आरोप…

भाजप सदसत्वाचा राजीनाम देताना तडीमल्ला यांनी पत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या तामिळनाडू युनिटचे प्रमुख के. अन्नामलाई आणि इतर लोकांना टॅग केले आहे. तसेच अनेक गंभीर आरोप केले आहेत. “एका विशिष्ट व्यक्तीने माझे पैसे, मालमत्ता आणि कागदपत्रांची फसवणूक केली. यानंतर मला पक्ष आणि नेत्यांकडून कोणतेही समर्थन मिळालेले नाही, परंतु, त्यांच्यापैकी बरेच जण सक्रियपणे एकाच व्यक्तीला मदत करत आहेत आणि त्याला पाठिंबा देत आहेत असल्याचे तडीमल्ला यांनी म्हटले आहे. माझा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Exit mobile version