नवी दिल्ली : हिंडेनबर्गचा रिसर्चचा रिपोर्ट हा भारत, भारतातील संस्था, देशाची प्रगती आणि महत्त्वाकांक्षांवर पद्धतशीर केलेला हल्ला आहे, असं म्हणत अदानी ग्रुपकडून (Adani Group) हिंडेनबर्गला ऊत्तर दिले आहे. यावेळी हा अहवाल स्वतंत्र, वस्तुनिष्ठ किंवा सखोल संशोधनानंतर तयार केलेला नाही, असंही अदानी ग्रुपकडून म्हणण्यात आलं आहे. आपल्या 413 पानांच्या उत्तरात, अदानी ग्रुपने अहवालात उपस्थित केलेल्या सर्व 88 प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत.
Adani Group’s detailed response to Hindenburg’s Unsubstantiated Accusationshttps://t.co/byWV8z9q6O
— Adani Group (@AdaniOnline) January 29, 2023
आपल्या उत्तरात अदानी ग्रुपने म्हटले आहे की हा अहवाल खोटा बाजार तयार करण्याच्या हेतूने प्रेरित आहे जेणेकरून अमेरिकन फर्मला आर्थिक लाभ मिळू शकेल. हा केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवास्तव हल्ला नाही, तर भारतावर, भारतीय संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता आणि गुणवत्ता आणि भारताची प्रगती आणि महत्त्वाकांक्षा यावर पद्धतशीर हल्ला आहे.
हिंडेनबर्ग अहवाल पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपकडून गुरुवारी म्हटले होते की हिंडेनबर्ग रिपोर्टचा शेअरधारक आणि गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. अदानी ग्रुपचे कायदेशीर प्रमुख जतीन जलुंधवाला म्हणाले होते की, अहवालामुळे भारतीय शेअर बाजारातील अस्थिरता ही चिंतेची बाब आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीचा फायदा शॉर्ट सेलर हिंडेनबर्गला होईल, असेही जलुंधवाला यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्गच्या दिशाभूल करणाऱ्या अहवालाबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.
Media statement – II on a report published by Hindenburg Research pic.twitter.com/Yd2ufHUNRX
— Adani Group (@AdaniOnline) January 26, 2023
हिंडेनबर्गचा रिपोर्ट नक्की काय ? वाचा.
https://letsupp.com/international/hindenburg-research-to-adani-group-shock-understand-the-whole-case-/8671.html