Download App

Varanasi Gyanvapi Mashid सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टानंतर हायकोर्टाचीही स्थगिती, 3 ऑगस्टला येणार निर्णय

Varanasi Gyanvapi Mosque : अयोध्येत एकीकडे राम मंदिराची उभारणी होतेय. त्यामुळे धार्मिक वाद संपतील असं वाटत असतानाच वाराणसीतील ज्ञानवापी मशीदाचा वाद पुन्हा उफाळून आलाय. त्यात आज या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निकाल राखून ठेवला असून त्यावर 3 ऑगस्टला अंतिम सुनावणी होणार आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टाप्रमाणे हायकोर्टाने देखील मशिदीच्या सर्वेक्षणाला निर्णय येत नाही तोपर्यंत स्थगिती दिली आहे. ( After Supreme Court High Court too stay on Varanasi Gyanvapi Mashid ASI survey )

5 वर्षात देशात एकाही IIT अन् IIM ची स्थापना नाही! मंत्र्यांनेच काढली PM मोदींच्या दाव्यातील हवा

काशी विश्वनाथ मंदिराजवळील मां शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणातील हिंदू बाजूची मागणी मान्य करून, शुक्रवारी 21 जुलैला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील न्यायालयाने वाजुखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्व आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. मात्र नंतर या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच मुस्लिम पक्षाला हायकोर्टात जाण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर याप्रकरणावर हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत चालणार; अधिवेशन गुंडाळण्याच्या चर्चांना पूर्णविराम

ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण काय ?

वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरातच ज्ञानवापी मशिद आहे. ही मशिद मूळ मंदिराच्या जागेवर असल्याचा दावा हिंदू पक्षकाराकडून करण्यात आलाय. दिल्लीतील पाच महिलांनी वाराणसीच्या एका न्यायालयात 2021 मध्ये एक याचिका दाखल केली होती. या मशिद परिसरात श्रृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान, आदि विश्वेश्वर, नंदीजी या देवता आहेत. या देवतांचं दर्शन, प्रार्थना करण्याची परवानगी मागितली होती. तेथून न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे.

या मशिदीतील वजूखाना म्हणजे शिवलिंगच असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लिम पक्षकारांकडून हा कारंजा असल्याचे सांगण्यात येते. कोर्टाच्या आदेशाने हा भाग सील केलेला आहे. अनेकदा याबाबत याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. तर तीन दिवसांपूर्वी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या वजूखाना भागाला सोडून इतर भागात भारतीय पुरातत्व खात्याला सर्वेक्षण करण्यास आदेश दिले आहेत.

ASI च्या सर्वेक्षणात काय आहे?

ही संस्था पुरातत्व सर्वेक्षण करते. त्यात जुन्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. यासाठी कार्बन डेटिंग, डेंड्रोक्रोनोलॉजी, एथनोक्रोनॉलॉजी, पुरातत्व उत्खनन, स्ट्रॅटिग्राफी या पद्धती वापरल्या जातात. कार्बन डेटिंगमुळे त्या वस्तूंचे वय कळते. ऐतिहासिक तथ्यांशी त्यांची जुळवाजुळव करून इमारत किंवा वस्तू कधी बांधली गेली याची खात्री केली जाते. अयोध्यातील राम जन्मभूमी व बाबरी मशिदवादामध्ये एसएसआयने सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणााच्या आधार घेत न्यायालयाने खटल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे एएसआय सर्वेक्षणाला कायदेशीर आधार आहे. त्यामुळे एसएसआय सर्वेक्षणाची भूमिका ज्ञानवापी मशिदप्रकरणातही महत्त्वाचे ठरू शकते. या सर्वेक्षणानंतर कोणत्या पक्षाचा दावा किती मजबूत आहे. याचे वैज्ञानिक पुरावे मिळतील. त्यामुळे गेल्या साडे तीनशे वर्षांपासून सुरू असलेला हा वाद एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय.

Tags

follow us