Family Planning : महिलेला 55 वर्षी बाळ झालं. या दाम्पत्याला आता हे 17 वं बाळ झालं आहे. (Family) त्यावेळी त्याचे नातू सुद्धा बाळ पाहायला आले होते. या व्यक्तीनं आरोग्य यंत्रणांची झोप उडवली आहे. आपण अत्यंत गरीब असून आपल्या डोक्यावर साध छत सुद्धा नसल्याच्या या इसमाच्या दाव्याने यंत्रणा कोमात गेल्या आहेत. अर्थात गरिबीचा आणि अपत्य होण्याचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही. पण आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा, त्याची हौसमौज करण्याचा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो. त्यातच आता हम दो हमारे दो वर अनेक जण थांबतात. त्याला ही व्यक्ती अपवाद ठरली आहे.
राजस्थानमधील उदयपूर येथील आदिवासी बहुल अंचल झाडोल या भागात हा प्रकार समोर आला आहे. सरकारच्या संतती नियमन आणि कुटुंब नियोजन दाव्याचा फोलपणा या घटनेने उघड केला. तर स्त्री म्हणजे मुलं पैदा करण्याची मशीन नाही या विचाराला ही येथे काही अर्थ उरलेला नसल्याची टीका होत आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रात 55 वर्षांच्या रेखा कालबेलिया यांनी 17 व्या बाळाला जन्म दिला. यापूर्वी त्यांनी 16 मुलांना जन्म दिला आहे. त्यांचे 4 मुलगे आणि एक मुलगी जन्मानंतर वारलीत. तर त्यांच्या 5 मुलांचे लग्न झाले असून त्यांना सुद्धा मुलं आहेत.
मोठी बातमी, मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी
सर्वजनिक आरोग्य केंद्रात त्यांच्या या वयात आई होण्याचे अप्रुप अनेक स्त्रीयांना सुद्धा होते. रेखा यांचे पती कवरा कालबेलिया यांनी सांगितले की, त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही. ते अत्यंत हालाकीचं जीवन जगत आहेत. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी सावकाराकडून 20 टक्के व्याजदराने कर्ज घेतले आहे. त्यांनी त्यापोटी एक लाख रुपये चुकते केले आहे. पण कर्जाचा बोजा काही कमी झालेला नाही.
कवरा हे भंगार जमा करतात आणि त्याची विक्री करतात. त्यांना शिक्षणाचा गंध नाही. त्यांनी कधी मुलांनाही शाळेत पाठवलं नाही. त्यांच्या नावावर जमीन नाही. त्यामुळे पीएम आवास योजनेचा त्यांना फायदा घेता आला नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्याने यंत्रणेला झटका बसला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, आदिवासींमध्ये कुटुंब नियोजनाविषयीची जागरुकता झालेली नाही. तर काहींनी हा शिक्षणाचा अभाव असल्याचे म्हटले आहे.