सीजेपी पार्टीच्या मोठ्या यशानंतर आता सोशल मीडियावर ‘E20’चा धुमाकुळ, केली ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

प्रत्येक प्रकारच्या इंधनावर स्पष्ट लेबलिंग असावी. विविध इंधन मिश्रणांचे फायदे आणि तोटे याबाबतची माहिती द्यावी.

E 20 Ethenol

सीजेपी पार्टीच्या मोठ्या यशानंतर आता सोशल मीडियावर नव्या पार्टीचा धुमाकुळ, केली या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागमी

कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीच्या (CJP) मुद्द्यावरून सरकारला घेरले आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत आता सोशल मीडियावर आणखी एका नव्या पार्टीची एंट्री झाली आहे. E20 जनता पार्टी असे या पार्टीचं नाव आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळं हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला गेला होता. मात्र, आता इथेनॉल मिश्रित इंधन (E20) पुन्हा चर्चेत आलं आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार, E20 जनता पार्टी स्वतःला नागरिकांच्या वतीने चालवली जाणारी ग्राहक हक्कांची मोहीम असल्याचे सांगते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासाठी स्वतंत्र हँडलही तयार करण्यात आले आहे. या पार्टीचे म्हणणे आहे की, ‘इंधन धोरणामध्ये पारदर्शकता, योग्य माहिती आणि ग्राहकांच्या पसंतीचा आदर केला गेला पाहिजे. इतर उत्पादनांप्रमाणेच पेट्रोल खरेदी करतानाही ग्राहकांना स्वतःच्या पसंतीचे इंधन निवडण्याचा अधिकार मिळायला हवा.

सरकारवर प्रचंड दबाव म्हणूनच ; कॉक्रोज जनता पार्टीचा मोठा दावा

E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे. सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, त्यांची सब्सिडी, मोफत इंधन किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. आम्हीला फक्त एवढेच हवे आहे की, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा. या पार्टीने म्हटले की, ‘अनेक वाहनमालकांनी मायलेज कमी होणे, इंजिनमध्ये बिघाड, देखभाल खर्च वाढणे आणि दीर्घकालीन इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचाही पर्याय उपलब्ध करून द्यावा.’

E20 जनता पार्टीने पुढील काही मागण्याही केल्या आहेत. प्रत्येक प्रकारच्या इंधनावर स्पष्ट लेबलिंग असावी. विविध इंधन मिश्रणांचे फायदे आणि तोटे याबाबतची माहिती द्यावी. मायलेज, इंजिनवरील परिणाम, प्रदूषण आणि देखभाल खर्च यावर स्वतंत्र संशोधन करून त्याचे अहवाल नागरिकांसमोर मांडावेत. ग्राहकांना संपूर्ण माहितीच्या आधारे कोणते इंधन खरेदी करायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा.

CJP शी साम्य काय?

E20 जनता पार्टी कॉकरोच जनता पार्टी सारखीच दिसते. ही मोहीमही सोशल मीडिया, मीम्स आणि व्यंग्याच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात मे 2026 मध्ये एका सटायर (व्यंगात्मक) मोहिमेच्या स्वरूपात झाली होती. मात्र, नंतर NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ही मोहीम देशाच्या राजधानीत मोठ्या विद्यार्थी आंदोलनात परिवर्तित झाली, ज्यामध्ये देशभरातील विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला. E20 जनता पार्टीनेही त्याच पद्धतीचा अवलंब केला आहे.

सध्या फक्त डिजिटल मोहीम

सध्या तरी E20 जनता पार्टी ही कोणतीही अधिकृत संघटना नाही. या मोहिमेचा कोणताही अधिकृत संस्थापक, संघटनात्मक रचना किंवा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरचे आंदोलन अद्याप झालेले नाही. ही मोहीम सध्या सोशल मीडियावरील डिजिटल अभियान म्हणून सक्रिय आहे. असं असलं तरी X आणि इन्स्टाग्रामवर या मोहिमेला झपाट्याने प्रतिसाद मिळत आहे.

Exit mobile version