Download App

वायनाड दुर्घटनेनंतर तिसरीतील विद्यार्थ्याचे पत्र होतेय व्हायरल; ‘INDIAN ARMY’ने केलं ट्वीटवर पोस्ट

वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेत कठीण काळात मदत आणि बचाव कार्यात आपला जीव धोक्यात घालणाऱ्या लष्कराबद्दल विद्यार्थ्याचं पत्र झालं व्हायरलं.

  • Written By: Last Updated:

Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. अनेक लोक जखमी झाले. त्यामध्ये किंत्येक लोक आताही अडकलेले आहेत. ही परिस्थिती पाहून लहान मुलांच्याही भावना ओथंबून आल्या. (Landslide ) त्यांनाही या सगळ्या घटनेच अतिव द:ख झालं. यामध्ये मदत आणि बचाव कार्यात आपला जीव धोक्यात घालणाऱ्या लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांचं सर्वजण कौतुक करत आहेत आणि त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

वायनाडच्या भूस्खलन दुर्घटनेत रेडिओ जॉकी ठरले मदतीचा हात; यंत्रणा अन् लोकांच्यामध्ये बांधला संवाद पूल

या मदत करणाऱ्या जवानांचं काम पाहून इयत्ता तिसरीचा विद्यार्थी मोठा प्रभावित झाला आहे. त्या विद्यार्थ्याने लष्कराला लिहिलेल्या पत्राने लष्करासह लोकांचीही मने जिंकली आहेत. विद्यार्थ्याने लिहिले की, मी लष्कराच्या कामाने इतका प्रभावित झाला आहे की, मी मोठा झाल्यावर त्यालाही सैन्यात भरती व्हायचे आहे. विद्यार्थ्याचं हे पत्र पाहून लष्करांनी मोठा आनंद झाला. त्यांनी स्वतः ते पत्र आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलं आणि विद्यार्थ्याचे आभारही व्यक्त केले आहेत.

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने शेअर केलेल्या पत्रानुसार, केरळच्या एएमएलपी शाळेतील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी रायनने मल्याळममध्ये लिहिले आहे, ‘Dear Indian Army, माझ्या प्रिय वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. तुम्हाला ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवताना पाहून मला अभिमान आणि आनंद झाला. मी नुकताच तो व्हिडीओ पाहिला, ज्यात तुम्ही बिस्किटे खाऊन तुमची भूक भागवत आहात. त्या दृश्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आणि मी एक दिवस भारतीय सैन्यात सामील होऊन माझ्या देशाचे रक्षण करू इच्छितो.

Pune Rain Update: पुणेकरांनो सावध राहा ! हवामान विभागाचा रेड अलर्ट, खडकवासलातून विसर्ग वाढला !

सैन्याने त्या विद्यार्थ्याचे पत्राबद्दल आभार मानले आणि त्याला छोटा सैनिक म्हटलं. लष्कराच्या दक्षिण कमांडने ट्विटरवर पोस्ट केले आहे की, ‘तुझ्या शब्दांनी आम्ही भारावलो आहे. प्रतिकूल परिस्थितीत, आमचे ध्येय आशेचा किरण बनणं आहे. तुमच्यासारखे हिरो आम्हाला आमचे सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतात. तू लष्कराचा गणवेश परिधान करून आमच्यासोबत उभे राहशील त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपण सर्व मिळून आपल्या देशाचा अभिमान वाढवू. तुझ्या धैर्याबद्दल आणि प्रेरणेबद्दल धन्यवाद अशा शब्दांत जवानांनी विद्यार्थ्याचा गौोरव केला.

 

follow us