PMFBY : देशभरातील विविध राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे दावे प्रलंबित असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत सांगितलं आहे. या योजनेतील 2021-22 सालातील 2,761.10 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. त्यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला मिळणारे पीक विम्याचे पैसे सर्वाधिक प्रलंबित आहेत. (agriculture crop insurance claims worth around rs 2761 crore under the pradhan mantri fasal bima yojana were pending till 2021-22 rajasthan maharashtra and gujarat)
Rahul Gandhi : राहुल गांधींची ‘घर वापसी’; खासदारी मिळताच सरकारी घरही मिळालं
तसेच या तीन राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप अडीच हजार कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाही, त्यात महाराष्ट्रातील 336 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत लेखी उत्तरात पीक विम्यासंदर्भात माहिती दिली आहे.
ऐन पावसाळ्यात राजकारण तापणार; एका बाजूने शरद पवार तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस उतरणार मैदानात
महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील काही शेतकऱ्यांना अद्याप पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, या योजनेत महाराष्ट्राची भरपाई 336 कोटी रुपये आहे. तर राजस्थान राज्याची सर्वाधिक भरपाई असून ही भरपाई 1300 कोटी इतकी आहे.
‘उद्धवजी, वाचाळपणा बंद करा अन्यथा लोकांचा संयम’..; विखे पाटलांचा ठाकरेंना रोखठोक इशारा
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ही रक्कम पीक काढणीला आल्यानंतर दोन महिन्यांत दिले जातात. त्यानूसार शेतकऱ्यांना प्रिमियम सबसिडीचा एकूण हिस्सा वेळेत मिळतो. मात्र, दाव्यांचा निपटारा होण्यास उशीर झाल्याच्या कारणाने उत्पन्नाची माहिती विलंबित प्रसारित झाली, असल्याचं तोमर म्हणाले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे न मिळण्यामध्ये राजस्थान राज्य आघाडीवर असून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातही दावे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. राजस्थानमध्ये 1387.34 कोटी, महाराष्ट्र 336.22 कोटी, गुजरात 258.87 कोटी, कर्नाटक 132.25 कोटी आणि झारखंड 128.24 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत.