Download App

Video : निवडणुकीपूर्वी केजरीवालांचा मोठा डाव, दलित विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर

  • Written By: Last Updated:

Arvind Kejriwal announces Dr Ambedkar Samman Scholarship for Dalit students : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी खेळी केली आहे. पत्रकार परिषदेत केजरीवालांनी दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांसाठी डॉ.आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी केजरीवाल यांनी 3 दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांची खिल्ली उडवल्यावरून भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.

केजरीवाल म्हणाले की, बाबासाहेब हयात असतानाही त्यांची खिल्ली उडवली जायची पण, बाबासाहेबांमुळेच संसद आहे आणि त्याच संसदेत त्यांची खिल्ली उडवली जाईल, असे कुणालाही वाटले  नाही. घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. दलित समाजातील एकही मूल पैशाअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी माझी इच्छा आहे त्यासाठी मी बाबासाहेबांच्या सन्मानार्थ दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांसाठी डॉ.आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर करत असल्याचे जाहीर केले.

शिक्षणाचा सर्व खर्च दिल्ली सरकार उचलणार

केजरीवाल म्हणाले की, आज मी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्तीची घोषणा करत आहे, ज्या अंतर्गत दलित समाजातील कोणत्याही मुलाला जगातील कोणत्याही सर्वोच्च विद्यापीठात शिक्षण घ्यायचे असेल, तर तो मुलगा त्या विद्यापीठात प्रवेश घेऊ शकतो आणि त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च दिल्ली करेल.

योजना सरकारी कर्मचाऱ्यांनाही लागू होणार

केजरीवाल पुढे म्हणाले की, स्वतंत्र भारतात परदेशी विद्यापीठांमध्ये शिकण्यास कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून मी दलित समाजासाठी ही योजना जाहीर करत आहे. दलित समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू होणार आहे.

follow us