Ahmedabad Air India Plane Crash Female Astrologer Sharmishtha Prediction : संपूर्ण देशासाठी 12 जून हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबादमध्ये एका विमानाचा अपघात झाला अन् क्षणात सगळं काही होत्याचं (Ahmedabad Plane Crash) नव्हतं झालं. विमानातील एकूण 242 प्रवाशांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अपघातनंतर अनेक फोटो, व्हिडिओ (Air India Plane Crash) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशातच एक सोशल मिडिया पोस्ट तुफान व्हायरल होतेय, ही पोस्ट एका महिला ज्योतिषीची आहे. पोस्टमध्ये नेमकं काय? त्याचा अहमदाबाद अपघाताशी काय संबंध, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.
तारीख अन् एक अपघात
सोशल मीडियावर व्हायरल होणारी महिला ज्योतिषीने एक ट्विट केलं होतं. ही पोस्ट पाच जून रोजी केली गेली होती. यामध्ये तारीख अन् एक अपघात, असं सांगितलं गेलं होतं. ही पोस्ट पाहून आता मात्र आश्चर्याचा मोठा धक्का बसत आहे. या महिला ज्योतिषीने 5 जून रोजी ट्विट करत विमान अपघात आणि विमान वाहतूक क्षेत्रात संभाव्य विनाशाचा इशारा दिला होता. त्यानंतर बरोबर सात दिवसांनी 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झालाय. अपघातानंतर, हे ट्विट आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.
https://x.com/AstroSharmistha/status/1930601830838366551
‘ऊत’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर! अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण
महिला ज्योतिषीची पोस्ट व्हायरल…
या महिला ज्योतिषीचे नाव शर्मिष्ठा आहे. त्यांनी @AstroSharmistha या x सोशल मीडियावर हॅंडलवरून पोस्ट केली होती. महिला ज्योतिषीने ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 2025 मध्ये विमान वाहतूक क्षेत्रामध्ये मोठी भरभराट होईल. परंतु, या काळामध्ये मोठे अपघात होण्याची शक्यता देखील आहे. जेव्हा गुरु मृगशिरा आणि आर्द्रा नक्षत्रांमध्ये असेल, तेव्हा विमान वाहतूक क्षेत्रात विकास होईल, परंतु सुरक्षितता आणि स्थिरतेचा अभाव असेल, असा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केला होता. विमान अपघाताच्या माझ्या भाकितावर मी अजूनही ठाम आहे, असं देखील या ज्योतिषीने म्हटलं होतं. नेमकं तसंच घडलंय.
क्षणांत मिटलं स्वप्न! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधील क्रू मेंबर्स आणि पायलटची शेवटची श्वासगाथा
नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस!
अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ज्योतिषाचे जुने ट्विट शोधण्यास सुरुवात केली. काही वेळातच ही पोस्ट व्हायरल देखील झाली आहे. #ArtOfPrediction असा ट्रेंड ट्रेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतंय. महिला ज्योतिषीने तिच्या ट्विटमध्ये असंही सांगितलं होतं की, टाटा ग्रुप हैदराबादमध्ये राफेल जेटचे मॉडेल बनवेल. येत्या दोन वर्षांमध्ये इस्रो अंतराळ पर्यटन आणि उपग्रह तंत्रज्ञानात जगाला आश्चर्यचकित करेल. नक्षत्र संक्रमणाच्या आधारे या सर्व भविष्यवाण्या त्यांनी केल्याची माहिती मिळतेय.