GST Collection April 2025 : एप्रिल महिन्यात सरकारने जीएसटी संकलनातून तब्बल 2.37 लाख (GST Collection April 2025) कोटी रुपये जमा केले आहे. एप्रिल 2025 मध्ये जीएसटी संकलन 12.6 टक्क्यांनी वाढून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये वस्तू आणि सेवा कर (GST ) संकलन वार्षिक आधारावर 12.6 टक्क्यांनी वाढून सुमारे 2.37 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.
तर दुसरीकडे एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी रुपये होते. जे आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक संकलन आहे. तर मार्च 2025 मध्ये कर संकलन 1.96 लाख कोटी रुपये होते. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा जीएसटी महसूल 10.7 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.9 लाख कोटी रुपये झाला, तर आयात केलेल्या वस्तूंमधून मिळणारा महसूल 20.8 टक्क्यांनी वाढून 46,913 कोटी रुपये झाला. गेल्या महिन्यात जारी केलेले परतावे 48.3 टक्क्यांनी वाढून 27,341 कोटी रुपये झाले.
तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीएसटी कौन्सिलची 56 वी बैठक मे किंवा जून महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक राज्य सरकारे त्यांच्या संबंधित अर्थसंकल्पीय अधिवेशने आणि कायदेविषयक प्रक्रियांमध्ये व्यस्त असल्याने यावेळी जीएसटी बैठकीला उशीर होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
नियमांनुसार, जीएसटी कौन्सिलची बैठक दर तीन महिन्यांनी होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या चार महिन्यापासून जीएसटी कौन्सिलची बैठक झालेली नाही. जीएसटी कौन्सिलची शेवटची बैठक डिसेंबर 2024 मध्ये झाली होती. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये जीएसटी दरामध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे आता जीएसटी कौन्सिलची पुढची बैठक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.