Amarnath Yatra registration start tour for 52 days : बाबा बर्फानींचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असलेल्या भाविकांसाठी ( Devotee) आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता लवकरच अमरनाथ यात्रा ( Amarnath Yatra ) सुरू होणार आहे. त्यासाठी आजपासून रजिस्ट्रेशन ( Registration ) सुरू झाली आहे. यावर्षी ही यात्रा 52 दिवस चालणार आहे. म्हणजे 29 जून ते 19 ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार आहे.
Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार
अमरनाथ यात्रा दोन मार्गांनी केली जाते. एक अनंतनाग जिल्ह्यातून पारंपारिक 48 किलोमीटर नुनवान पहेलगाम मार्ग आहे. तर दुसरा गांदेरबल जिल्ह्यातून चौदा किलोमीटरचा बालटाल मार्ग आहे. श्रीनगर पासून तब्बल 141 किलोमीटर दूर आणि समुद्रसपाटीपासून तब्बल 12 हजार 756 फूट उंच अशा ठिकाणी अमरनाथ येथे ही गुहा आहे.
बळाचा वापर केल्याने युनोचा इस्त्रायलला इशारा तर अमेरिकेकडून इराणवरही कारवाईची मागणी
तर येथील पवित्र गुहेमध्ये बाबा बर्फानी म्हणजेच भगवान शंकराचं बर्फाचे शिवलिंग तयार झाल्यानंतर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तर वर्षभरात हे दोन महिने असे असतात. जेव्हा अमरनाथाच्या गुहेत भगवान शंकराचे बर्फाचे शिवलिंग तयार होतं. तसेच या ठिकाणी भाविकांना जाता येत.
ही यात्रा अत्यंत खडतर आहे. त्यामुळे आतापासूनच या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. कारण दरम्यान खराब वातावरण आणि नैसर्गिक आपत्तींची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. यासाठी एनडीआरएफ आणि एसटीआरएफ तसेच स्थानिक पोलीस यांच्याकडून येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षा प्रदान केले जाते.